सर्व्हिस रोडवर साचते पावसाचे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:08 IST2021-07-17T04:08:06+5:302021-07-17T04:08:06+5:30
कोंढाळी : नागपूर- कोंढाळी महामार्गाची निर्मिती अटलांटा कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. याअंतर्गत कोंढाळी येथे सर्व्हिस रोडही तयार करण्यात ...

सर्व्हिस रोडवर साचते पावसाचे पाणी!
कोंढाळी : नागपूर- कोंढाळी महामार्गाची निर्मिती अटलांटा कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे. याअंतर्गत कोंढाळी येथे सर्व्हिस रोडही तयार करण्यात आला होता. मात्र, एसटी बसस्थानकासमोर अटलांटा कंपनीने ड्रेनेज तयार न केल्याने येथील सर्व्हिस रोडवर पावसाचे पाणी साचत आहे. त्याचा फटका वाहन चालक व पादचाऱ्यांना बसत आहे.
कोंढाळी-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम बीओटी तत्त्वार करणाऱ्या अटलांटा (बालाजी) टोल कंपनीने कोंढाळी एसटी बसस्थानकासमोर उड्डाणपूल बांधला. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना सर्व्हिस रोड तयार करण्यात आले. मात्र, उड्डाणपुलाखाली जमा होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी गत १० वर्षांपासून ड्रेनेज तयार करण्यात आले नाही. स्थानीय नागरिकांनी यासंदर्भात वारंवार अटलांटा कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र, याची दखल घेण्यात आलेली नाही.