नागपुरात पावसाला सुरुवात; सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 10:23 IST2021-03-18T10:22:49+5:302021-03-18T10:23:37+5:30

Nagpur News गुरुवार सकाळपासून नागपुरात ढगाळ हवामान असून, पावसाची रिमझिम सर्वदूर सुरू झाली आहे.

Rains begin in Nagpur; Cloudy weather | नागपुरात पावसाला सुरुवात; सतर्कतेचा इशारा

नागपुरात पावसाला सुरुवात; सतर्कतेचा इशारा



लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गुरुवार सकाळपासून नागपुरात ढगाळ हवामान असून, पावसाची रिमझिम सर्वदूर सुरू झाली आहे.
नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने नागपूरसह वर्धा, भंडारा आणि गोंदिया या चार ठिकाणी सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या चार दिवसात विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, १९ मार्चला वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीट आणि विजेची शक्यता वर्तविली आहे. हे वादळ ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाचे असेल, असे म्हटले आहे.
हवामान विभागाने जारी केलेल्या दैनंदिन प्रसारणातील माहितीमध्ये १९ तारीख सतर्कतेचा इशारा देणाऱ्या आॅरेंज रंगात दर्शविली आहे. नागरिकांना आणि शेतक?्यांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात या दिवशी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे.  वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातही या दिवशी इशारा देण्यात आला आहे. तर २० तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Rains begin in Nagpur; Cloudy weather

टॅग्स :Rainपाऊस