हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:07 IST2021-04-14T04:07:17+5:302021-04-14T04:07:17+5:30
नागपूर : विदर्भातील जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र या अंदाजालाच पावसाने हुलकावणी दिली. मात्र ...

हवामान विभागाच्या अंदाजाला पावसाची हुलकावणी
नागपूर : विदर्भातील जिल्ह्यात दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र या अंदाजालाच पावसाने हुलकावणी दिली. मात्र आता १४ एप्रिलला यवतमाळ जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा नव्याने देण्यात आला आहे.
पावसाने अंदाज चुकविला असला तरी वातावरणात मात्र परिणाम झाला आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ या जिल्ह्यात १४ व १५ एप्रिलला पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासोबतच १६ तारखेला भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.
गेल्या २४ तासामध्ये विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमधील तापमान चांगलेच खालावले आहे. नागपुरात १.४ अंश सेल्सिअसने तापमानात घट होऊन ते ३७.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. अन्य सर्वच जिल्ह्यांमधील तापमान खालावले असून ढगाळी वातावरण निर्माण झाले आहे.