शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्रधनुष्य’मध्ये कलारंगांचा वर्षाव

By admin | Updated: January 24, 2016 02:54 IST

१३ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये शनिवारी उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरणनागपूर : १३ व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ सांस्कृतिक युवा महोत्सव ‘इंद्रधनुष्य’मध्ये शनिवारी उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले. विविध स्पर्धांच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांचे आकर्षक सादरीकरण केले. राज्यभरातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचा मंच प्रदान करणाऱ्या ‘इंद्रधनुष्य’चे शुक्रवारी उद्घाटन झाले. शनिवारपासून या महोत्सवातील स्पर्धांना खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. सकाळी ९ च्या सुमारास शास्त्रीय गायनाच्या स्वरांनी दीक्षांत सभागृहाने एक वेगळाच अनुभव घेतला. याचवेळी आमदार निवासामध्ये ‘आॅन द स्पॉट पेन्टिंग’ तसेच लेखी प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात आले होते. तर वसंतराव देशपांडे सभागृहात एकांकिका सुरू होत्या. विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस अशा एकांकिकांचे सादरीकरण केले. उपस्थितांनी याला मनमोकळेपणाने दाद दिली.दुपारच्या सुमारास दीक्षांत सभागृहात शास्त्रीय वादनाचे आयोजन झाले. शिवाय तालवाद्य सादरीकरणदेखील झाले. कागदापासून ‘कोलाज’ तयार करण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती अचंबित करणारी होती. काही विद्यार्थ्यांनी तर अप्रतिम ‘कोलाज’ तयार केले व परीक्षकांनादेखील कोड्यात टाकले.(प्रतिनिधी)विद्यार्थ्यांमध्ये दिसली शिस्तराज्यातील विविध विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आले असूनदेखील ‘इंद्रधनुष्य’मध्ये शिस्तीचे वातावरण दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनीच यात पुढाकार घेतला आहे. एखाद्या गोष्टीत संभ्रम निर्माण झाला तरी विद्यार्थी शांत राहून विचारणा करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिल्या दिवशी जरी काही प्रमाणात गैरसोय झाली असली तरी आता विद्यार्थ्यांची कुठलीही तक्रार नाही. विद्यापीठाचे अधिकारी विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेकडे आता जातीने लक्ष देत आहेत.