शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

प्रत्येक घरासाठी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:08 IST

भूजल संपदेचे संरक्षण, व्यवस्थापन आणि न्यायोचित समसमान वितरणासाठी कायदा करण्यात आला आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमावलीचा मसुदाही तयार झाला आहे. याअंतर्गत शहर किंवा गावात १००० चौ.फुटाचे घर बांधणाऱ्यांना ‘रेन वॉट हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय २०० फुटाच्यावर खोल विहीर किंवा बोअरवेल करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. लोकसहभागातूनच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी शक्य होणार असल्याचा विश्वास राज्य भूजल प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देभूजल व्यवस्थापनाचा नवा कायदा : अंमलबजावणी करणारे पहिले राज्य महाराष्ट्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूजल संपदेचे संरक्षण, व्यवस्थापन आणि न्यायोचित समसमान वितरणासाठी कायदा करण्यात आला आहे. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमावलीचा मसुदाही तयार झाला आहे. याअंतर्गत शहर किंवा गावात १००० चौ.फुटाचे घर बांधणाऱ्यांना ‘रेन वॉट हार्वेस्टिंग’ची व्यवस्था करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय २०० फुटाच्यावर खोल विहीर किंवा बोअरवेल करण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. लोकसहभागातूनच या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी शक्य होणार असल्याचा विश्वास राज्य भूजल प्राधिकरणाचे सदस्य अ‍ॅड. विनोद तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.भूजल कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही अ‍ॅड. तिवारी यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले, राज्य भूजल प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य भूजल नियम २०१८ चा सविस्तर मसुदा राज्य सरकारने प्रसिद्ध केला असून, त्यात भूजल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे जतन करणे, अधिसूचित नसलेल्या क्षेत्रातील अस्तित्वातील विहिरींच्या भूजल वापरावर उपकर लावणे, अधिसूचित क्षेत्रात ग्रामसभेद्वारे पीक पद्धतीचा निर्णय घेणे, जिल्हा पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवणे, वाळू खाणकामाचे नियमन व प्रतिबंध याबाबतच्या अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी कायद्यात करण्यात आल्या आहेत. दुष्काळाच्या काळात वैयक्तिक विहिरी सार्वजनिक वापरासाठी अधिग्रहित करण्याचे अधिकार प्राधिकरणाला राहणार आहेत. या नियमावलीमुळे भूगर्भातील पाण्याचे मोजमाप व नियोजन करणे शक्य होणार असून, तरतुदींबाबत नागरिकांकडून ३१ आॅगस्टपर्यंत सूचना व आक्षेप मागविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे राजेंद्र हटवार, अ‍ॅड. विजय भागडीकर उपस्थित होते.कार्यशाळा २३ लाभूजल नियमांबाबत जनजगृतीसाठी २३ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव एस. एल. गोयल, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे राज्य संचालक शेखर गायकवाड नियमावलीसंदर्भात सविस्तर माहिती देतील.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणी