पावसाने घेतली उसंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:36+5:302021-09-23T04:09:36+5:30

नागपूर : हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी पावसाने मात्र उसंत घेतल्याचे बुधवारी दिसले. विदर्भात केवळ गोंदिया वगळता ...

The rain took its toll | पावसाने घेतली उसंत

पावसाने घेतली उसंत

नागपूर : हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असला तरी पावसाने मात्र उसंत घेतल्याचे बुधवारी दिसले. विदर्भात केवळ गोंदिया वगळता दिवसभरात पावसाची कुठेच नोंद नाही.

नागपुरात सकाळपासूनच उन्ह पडले होते. दिवसभर आकाशात ढग नसल्याने वातावरण मोकळे होते. यामुळे किमान तापमानात कालच्यापेक्षा वाढ होऊन ते ३२.८ अंश सेल्सिअसवर गेले. सकाळी आर्द्रता ८९ टक्के होती, सायंकाळी ७७ टक्के नोंदविली गेली. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३२.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. बुधवारी बऱ्यापैकी उन्ह पडल्याने वातावरणात दमटपणा जाणवत होता.

विदर्भात बुधवारी एकमेव गोंदिया जिल्ह्यात १० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. अन्यत्र दिवसभरात कुठेही पावसाची नोंद नाही.

...

विभागात १८८ धरणे १०० टक्के भरली

नागपूर जिल्ह्यात असलेल्या ३७२ मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांपैकी १८८ धरणे १०० टक्के भरली आहेत. २२ तारखेपर्यंत ही संख्या १८४ होती. मंगळवारी रात्रीपर्यंतच्या पावसामुळे ही संख्या आता ४ ने वाढली. सायकी (नागपूर) व चांदपूर (भंडारा) हे दोन मध्यम आणि भिवापूर (नागपूर) व वडेगाव (नागपूर) हे दोन लघु प्रकल्प बुधवारी सकाळी १०० टक्के भरल्याची नोंद झाली.

Web Title: The rain took its toll