शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अधिकृत प्रवाशांच्या अधिकारांचे संरक्षण करणे रेल्वेची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:21 IST

ग्राहक आयोगाचा निर्णय : कर्तव्य नाकारल्यामुळे फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निर्धारित ठिकाणी जाण्यासाठी सुरक्षित व अडथळारहित प्रवास घडणे हा अधिकृत प्रवाशांचा अधिकार आहे, असे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मध्य रेल्वेविरुद्धच्या एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. तसेच अधिकृत प्रवाशांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे, याकडे लक्ष वेधून कर्तव्य बजावण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांना फटकारले.

आयोगाचे अध्यक्ष सचिन शिंपी व सदस्य बाळकृष्ण चौधरी यांनी हा निर्णय दिला. अशोक नागदिवे व इतर १५ प्रवाशांनी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपूर येथून गोरखपूरला जाण्यासाठी व २२ ऑक्टोबर २०२२ रोजी गोरखपूर येथून नागपूरला परतण्यासाठी राप्तीसागर एक्स्प्रेसचे आरक्षण श्रेणीतील तिकीट खरेदी केले होते. १७ऑक्टोबर रोजी ही गाडी दोन तास विलंबाने सायंकाळी ७.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर आली. परंतु, गाडीच्या आरक्षित डब्यांवर अवैध प्रवाशांनी कब्जा केला होता. त्यांच्या गर्दीमुळे नागदिवे व इतरांना गाडीत चढता आले नाही. परिणामी, त्यांनी सहायक स्टेशन मास्टर, आरपीएफ व जीआरपी अधिकाऱ्यांना मदत मागितली. परंतु, सर्वांनी हात वर केले. कोणीही अवैध प्रवाशांना बाहेर काढून नागदिवे व इतरांना त्यांची आरक्षित जागा मिळवून दिली नाही. परिणामी, त्यांना गाडी सोडून द्यावी लागली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांच्या तिकिटाचे पैसेही परत केले नाही. करिता, त्यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने ही तक्रार निकाली काढताना रेल्वे प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली.

तिकिटाचे पैसे व्याजासह परत देण्याचा आदेश

  • तक्रारकर्त्या प्रवाशांना तिकिटाचे १६ हजार रुपये ९ टक्के व्याजासह परत द्या. तसेच त्यांना शारीरिक, मानसिक त्रास व तक्रार खर्चापोटी ३५ हजार रुपये भरपाई अदा करा, असे आदेश आयोगाने मध्य रेल्वेला दिले आहेत.
  • व्याज १८ ऑक्टोबर २०२२ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. सर्व तक्रारकर्ते प्रवासी ज्येष्ठ नागरिक असून त्यांनी स्वतःच आपली बाजू मांडली. वकिलाची मदत घेतली नाही.
टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर