शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
2
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
3
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
4
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
5
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
6
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
7
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
8
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
9
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
10
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
11
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
12
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
14
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
15
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
16
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
17
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
18
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
19
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
20
Crime: रस्त्यातून अपहरण, जबरदस्तीनं दारू पाजली अन् रात्रभर सामूहिक अत्याचार; बिहार हादरलं!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेस होऊनही 'गोल्डन गँग'च्या मुसक्या बांधण्यात रेल्वे पोलिसांना अपयश

By नरेश डोंगरे | Updated: November 21, 2025 21:56 IST

सव्वा दोन कोटींच्या सोन्याचा तपास थंडबस्त्यात : एलसीबीचे ढुंढो ढुंढो रे साजना : लंपास केलेला माल 'पचण्याची' भिती 

-  नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हावडा-मुंबई मेलमधून सव्वादोन कोटींचे सोने उडविणारी गोल्डन गँग पोलिसांना ट्रेस झाली. मात्र, महिनाभराचा कालावधी होऊनही या टोळीच्या मुसक्या बांधण्यात रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आले नसल्याने पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसमधून सराफा व्यापारी किशोर ओमप्रकाश वर्मा (वय ४४, रा. गणपतीनगर, रा. जळगाव) रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ ला प्रवास करीत होते. त्यांच्याजवळ २.११ कोटी रुपये किमतीचे सोने होते. बडनेरा जवळ चोरट्यांनी हे सोने लंपास केले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांना गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन हा तपास नागपूर रेल्वेच्या क्राइम ब्रँचला (एलसीबी) सोपविण्यात आला. या तपासाला सायबरचे बळ मिळाल्याने ही धाडसी चोरी करणारी टोळी ट्रेस झाली. पश्चिम महाराष्ट्रातील या कुख्यात टोळीने अशाच प्रकारे मराठवाडा, आंध्रातही अनेक धाडसी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. मात्र, एवढी भक्कम माहिती हाती लागूनही ट्रेस झालेल्या या टोळीतील एकाही सदस्याच्या मुसक्या आवळण्यात रेल्वेच्या गुन्हे शाखेला यश आलेले नाही. त्यामुळे त्या टोळीने चोरलेल्या सोन्याची विल्हेवाट लावली की काय अर्थात हे सोने पचते की काय, अशी शंका वजा भिती संबंधितांना सतावत आहे.

तपास पथकाचा थंडपणासव्वादोन कोटींच्या सोन्यावर हात मारल्यानंतर या टोळीच्या सदस्यांनी बाहेरच्या बाहेर दिवाळी साजरी केली. ईकडे थंडीचा कडका वाढल्यामुळे की काय, हा तपास एलसीबीने थंडबस्त्यात टाकल्यासारखे झाले आहे.या संबंधाने एलसीबी तपास पथकाचे प्रमूख सहायक निरीक्षक विनायक डोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तपास सुरू आहे, असे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Golden Gang traced, but Railway Police fail to arrest culprits.

Web Summary : Despite tracing the 'Golden Gang' who stole gold worth crores from a train, railway police have failed to make any arrests. This raises concerns about the investigation's progress and the recovery of the stolen valuables.
टॅग्स :railwayरेल्वे