शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रेल्वे प्रवाशाचे एटीएम चोरुन १.७६ लाख उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 11:28 PM

रेल्वेगाडीने जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या हँडबॅगमधून अज्ञात आरोपीने पर्स चोरून त्यातील तीन एटीएमच्या साहाय्याने १ लाख ७६ हजार ६०० रुपये उडविल्याची घटना घडली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : रेल्वेगाडीने जात असलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या हँडबॅगमधून अज्ञात आरोपीने पर्स चोरून त्यातील तीन एटीएमच्या साहाय्याने १ लाख ७६ हजार ६०० रुपये उडविल्याची घटना घडली आहे. सीताबर्डी येथील अनिता बलराम फुलवानी (६३) निजामुद्दीनवरून नागपूरला येण्यासाठी रेल्वेगाडी क्रमांक १२४४२ निजामुद्दीन-बिलासपूर राजधानी एक्स्प्रेसमध्ये सोमवारी प्रवास करीत होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या हँडबॅगमधील लहान पर्स चोरी केली. त्यात वेगवेगळ्या बँकाचे तीन एटीएम कार्ड होते. अनिता फुलवानी यांनी तिन्ही एटीएम कार्डचे पासवर्ड त्याच्या मागे लिहिले होते. त्याचा फायदा घेऊन अज्ञात आरोपीने एका बँकेतून ६१ हजार, दुसऱ्या बँकेतून ९१ हजार आणि तिसऱ्या बँकेतून २४ हजार ६०० रुपये असे एकूण १.७६ लाख रूपये काढून घेतले. पैसे काढल्याची माहिती मिळताच त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

टॅग्स :atmएटीएमtheftचोरीRailway Passengerरेल्वे प्रवासी