रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST2021-05-05T04:11:34+5:302021-05-05T04:11:34+5:30
नागपूर : मोतीबाग येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्या आरोपीला अटक केली. वृंदावननगर, साहू मोहल्ला येथील निवासी ...

रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्यांना अटक
नागपूर : मोतीबाग येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या चमूने रेल्वेचे लोखंड चोरणाऱ्या आरोपीला अटक केली. वृंदावननगर, साहू मोहल्ला येथील निवासी गौरीशंकर रामाश्रय साहू असे आरोपीचे नाव आहे. १७ एप्रिल रोजी खापरखेडा आणि इतवारी सेक्शनमधील रेल्वे मार्गावर लागलेले ३५ हूक बेल्ट, २० फूट लांबीचे ३ अँगल, १ ब्रिज बोर्ड अज्ञात आरोपीने चोरी केले होते. या प्रकरणात आरपीएफने गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली होती. प्रभारी निरीक्षक राजीव कुमार यांच्या नेतृत्वात एस.के.दुबे, आरक्षक अंसारी, सतीश इंगळे, प्रकाश राय सेडाम, आरक्षक एल.एस. बघेल, गुरुदेव लाडे, आर. मंडाले, आर.कनोजिया यांनी चोरीच्या ठिकाणाजवळील एका शेतावर छापा मारला. तेथे आरोपी रेल्वेच्या लोखंडाचे तुकडे गोळा करताना आढळला. त्याने चोरीची कबुली दिली. त्याला सोमवारी रेल्वे कोर्टात नेण्यात आले.
आणखी तिघांना अटक
आणखी एका लोखंड चोरी प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाच्या सेटलमेन्ट पोस्टने तीन आरोपींनी अटक केली आहे. लोखंड चोरीच्या आरोपींना पकडण्यासाठी विशेष चमू बनविण्यात आली होती. कळमना पुलावरून ब्रिज बेल्ट चोरण्याच्या प्रकरणात इस्माईल उर्फ मो.अन्सारी (लालगंज चौक) व शेख फिरोज शेख सहाबुद्दीन (संगमनगर) यांना अटक केली. सोबतच रेल्वेचे लोखंड विकत घेणाऱ्या वसीम खान उर्फ सोनू नसीर खान (वनदेवीनगर) यालाही अटक केली.