रेल्वे इंजिनचे सुटे भाग चोरी करणाऱ्यांना अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST2021-05-13T04:08:33+5:302021-05-13T04:08:33+5:30
आरपीएफची कारवाई नागपूर : कन्हान रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या दोन इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनमधून ट्रान्सफॉर्मर ऑईल सर्क्युलेटिंग पाईपलाईनमध्ये लागलेले दोन ...

रेल्वे इंजिनचे सुटे भाग चोरी करणाऱ्यांना अटक ()
आरपीएफची कारवाई
नागपूर : कन्हान रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या दोन इलेक्ट्रिक रेल्वे इंजिनमधून ट्रान्सफॉर्मर ऑईल सर्क्युलेटिंग पाईपलाईनमध्ये लागलेले दोन पितळेचे वॉल आणि एक बँड पाईप चोरी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशाल ऊर्फ जय नितनवरे (रा. कन्हान) आणि त्याने दिलेल्या माहितीनुसार देवकुमार सूरजप्रसाद डेहारिया या भंगार व्यावसायिकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई इतवारी ठाण्याचे निरीक्षक आर. के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन, विवेक कनोजिया, इशांत दीक्षित, ओ. एस. चौहान यांनी पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कन्हान रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनमधून सुटे भाग चोरी केले होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आरपीएफचे सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांनी चमुचे गठण केले होते. या चमूने बुधवारी आरोपींना मुद्देमालासह अटक केली. त्यांच्याकडून ६२०० रुपये रेल्वेचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक मो. मुगीसुद्दीन करीत आहेत.
..................