रेल्वे क्वॉर्टरच्या दारुअड्ड्यावर धाड

By Admin | Updated: August 5, 2015 02:30 IST2015-08-05T02:30:55+5:302015-08-05T02:30:55+5:30

अजनीच्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूचा अड्डा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पोलीस आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांत खळबळ निर्माण झाली.

Rail quarts on the bunker | रेल्वे क्वॉर्टरच्या दारुअड्ड्यावर धाड

रेल्वे क्वॉर्टरच्या दारुअड्ड्यावर धाड

दणका लोकमतचा

आरपीएफ अन् पोलिसांत खळबळ :  आरोपी भलावीस घेतले ताब्यात
नागपूर : अजनीच्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूचा अड्डा सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पोलीस आणि आरपीएफच्या अधिकाऱ्यांत खळबळ निर्माण झाली. एकीकडे आरपीएफचे पथक या अड्ड्यावर कारवाईसाठी पोहोचले तर, त्यापूर्वीच अजनी ठाण्याच्या पोलिसांनी कारवाईची तत्परता दाखविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दारु विक्रेता मनोज भलावी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
‘रेल्वे क्वॉर्टरमध्ये दारूअड्डा’ या मथळ्यातील वृत्त लोकमतने बुधवारी प्रकाशित केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, कारवाईचे संकेत मिळाल्यामुळे पोलीस पोहोचण्यापूर्वीच दारू विक्रेत्याने तेथून मोठा साठा हलविला. दरम्यान, कारवाईसाठी आरपीएफचे पथक पोहोचण्यापूर्वीच तेथे अजनी पोलीस पोहोचले. पोलिसांना तेथे केवळ ३२० रुपयांची दारू मिळाली. त्यांनी दारू तसेच अड्डा चालविणाऱ्याला ताब्यात घेत पोलीस ठाणे गाठले. त्याचमुळे आरपीएफच्या पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान, लोकमतचे वृत्त वाचून आपण सहायक मंडळ आयुक्त संजय चौधरी यांना कारवाईचे आदेश दिल्याची माहिती आरपीएफचे वरिष्ठ कमांडंट ज्योतिकुमार सतीजा यांनी दिली. आरपीएफचे पथक घटनास्थळी गेले होते. मात्र, तत्पूर्वीच अजनी पोलिसांनी दारू अड्डा चालकाला अटक केल्याचे सांगून अशाप्रकारच्या कोणत्याही गैरकृत्याची नागरिकांनी तक्रार केल्यास तात्काळ दखल घेतली जाईल, असेही सतीजा म्हणाले.
त्यांनी गैरप्रकार उघड केल्याबद्दल लोकमतचे अभिनंदन करून धन्यवादही दिले; सोबतच रेल्वे वसाहतीत अशाप्रकारचे गैरप्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचेही ठासून सांगितले.(प्रतिनिधी)
कसून चौकशी
वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आम्ही त्याची तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्याचमुळे पोलीस पथकाने अड्ड्यावर धडक दिली. मात्र, केवळ ३२० रुपयांचीच दारू पोलिसांच्या हाती लागली. तथापि, दारू विक्रेत्याची कसून चौकशी सुरू असून, यापुढे असे काही घडल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अजनीचे ठाणेदार एस.डी. महाडिक यांनी दिली.

Web Title: Rail quarts on the bunker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.