शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

जायसवाल निकोचा रायगड पॉवर प्रकल्प जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 00:31 IST

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्रिव्हेंशन आॅफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) शुक्रवारी जायसवाल निको लिमिटेडची १०१ कोटी रुपयांची औद्योगिक संपत्ती जप्त केल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे ईडीची कारवाई : नियमांचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) प्रिव्हेंशन आॅफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) शुक्रवारी जायसवाल निको लिमिटेडची १०१ कोटी रुपयांची औद्योगिक संपत्ती जप्त केल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.प्राप्त माहितीनुसार, वर्ष २०१२ मध्ये जायसवाल निकोने गैरमार्गाने छत्तीसगड येथील गेर पाम्स कोल ब्लॉक मिळविल्याचा खुलासा झाला होता. सीबीआयने कंपनी आणि त्याच्या संचालकांविरुद्ध प्रथम खबरी अहवालाची (एफआयआर) नोंद करून कलम १२० बी आणि आयपीसीचे कलम ४२० व ४०६ अंतर्गत असलेल्या गुन्हेगारी प्रकरणात नवी दिल्ली येथील विशेष सीबीआय न्यायालयात चार्जशीट दाखल केली होती.सीबीआयच्या एफआयआरच्या आधारे ईडीने चौकशी सुरू केली होती. त्यात जायसवाल निकोने गैरमार्गाने आणि खोटी माहिती देऊन गेर पाल्म-४ कोल ब्लॉक मिळविण्याची माहिती उजेडात आली होती. ब्लॉक मिळविताना नमूद केल्याऐवजी कंपनीने कोळशाचा विविध प्रयोजनासाठी दुरुपयोग केल्याचे दिसून आले.मंजुरी पत्रानुसार, जायसवाल निकोला कोळशाची धुलाई करून राखेचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत कमी करून कोळशाचा उपयोग कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्पात करायचा होता. पण नियमाचे उल्लंघन करीत कंपनीने थेट कोळशाचा उपयोग कॅप्टिव्ह पॉवर प्रकल्पात केला. कंपनीने २००६ ते २०१५ पर्यंत ३.८ दशलक्ष टन कोळशाचे उत्खनन केले. या कोळशाची किंमत २०६ कोटी रुपये असल्याची बाब ईडीला चौकशीत आढळून आली.या आधारे ईडीने गेल्यावर्षी छत्तीसगड येथील दोगोरी स्टील प्रकल्पाची २०६ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. गेर पाम्स-४ कोल ब्लॉक मिळविल्यानंतर कंपनीने १०१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. पण कोल ब्लॉक गैरमार्गाने मिळविल्यामुळे ईडीने १०१ कोटी रुपयांनासुद्धा गुन्हेगारी उत्पन्नाचा एक भाग समजून शुक्रवारी सिल्तारा स्टील प्रकल्पाची संपत्ती जप्त केली. यामुळे ईडीचा जप्तीचा आकडा एकूण ३०७ कोटी रुपयांवर गेला आहे. शुक्रवारी जप्त केलेल्या संपत्तीत सिल्तारा स्टील प्रकल्पाची ८० कोटी रुपयांची जमीन आणि बिलासपूर प्रकल्पाच्या २१ कोटी रुपयांच्या जमिनीचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाड