शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नागपूरच्या इतवारी-इमामवाड्यातील जुगार अड्ड्यांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:07 IST

तहसील व अजनी पोलीस ठाणे परिसरात इतवारी आणि इमामवाडा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १६ आरोपीला पकडले. परंतु या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेत मोठा गोलमाल झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे१६ आरोपींना अटक : रोख रकमेत पुन्हा गोलमाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तहसील व अजनी पोलीस ठाणे परिसरात इतवारी आणि इमामवाडा येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १६ आरोपीला पकडले. परंतु या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेत मोठा गोलमाल झाल्याची माहिती आहे.इमामवाडा पोलिसांनी केवळ पाच आरोपीकडून २२,५३० रुपयासह ३५ हजाराचा माल जप्त केला तर तहसील पोलिसांनी व्यापारिक क्षेत्र असलेल्या इतवारी येथून ११ आरोपीकडून केवळ २१,२५० रुपये जप्त केल्याचे दाखविले आहे. त्यामुळे जुगार अड्ड्यावरील धाडीत जप्त करण्यात येणाऱ्या रकमेत गोलमाल होत असल्याचे या आठवड्यातील दुसरे प्रकरण आहे.तहसील पोलिसांना इतवारी भाजी मंडीत एका साडी स्टोर्सजवळ गुन्हेगार जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या आधारावर मंगळवारी रात्री उशिरा भाजीमंडीत धाड टाकण्यात आली. तेथून ११ आरोपीला जुगार खेळताना पकडले. यात अंकुश पिंटू बागडी, रा इतवारी, गौरव राजू यादव, रा. चित्रा टाकीज, मो. आरिफ शेख अहमद (३०)रा. हसनबाग, हितेश फुलचंद करवाडे (३०) रा.कुंभार टोली, शेख हारून मो. (३५) रा. लोहारपुरा, राहुल सिसोदिया (३०) रा. नंदनवन, अफजल शेख (२८) रा. मिनी माता नगर, अमित जमनाप्रसाद श्रीवास्तव (३४) रा. बजेरिया, योगेंद्र बनोदे (३२) रा. शिवाजी नगर, विनोद कुराडकर (२८) रा.शिवाजी नगर आणि अंगद शत्रघ्न यादव (२२) रा.फव्वारा चौक हे सापडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन २१,२५० रुपये जप्त कले. अटक करण्यात आलेले आरोपी अनेक दिवसांपासून सक्रिय आहेत. एका आरोपीच्या विरुद्ध चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे. तर इतरही विविध प्रकरणात सामील आहेत.यानंतरही पोलिसांना त्यांच्याजवळून केवळ २१,२५० रुपये सापडल्याने आश्चर्य आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून वाहन किंवा मोबाईल जप्त केल्याचाही उल्लेख केलेला नाही.त्याचप्रकारे झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांच्या चमूने इमामवाड्यातील सिरसपेठ येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी सायंकाळी धाड टाकली. तेव्हा त्यांना तिथे अतुल अशोकराव काकडे (४०) रा. भोलेनगर, विनोद बकारामजी गायधने (४८) रा. चंद्रभागा नगर, कृष्णा डोमाजी वाडीभस्मे (४४) महात्मा गांधी नगर, प्रमोद भाऊराव बागवान (४३) रा. उदयनगर आणि वसीम शेख लतीफ शेख (३४) रा. ताजनगर हे जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून २२, ३५० रुपयासह ३५ हजाराचा माल जप्त केला. दोन्ही प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या रकमेवरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.गेल्या आठवड्यात याच प्रकारे यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई दरम्यान रोख रकमेत गोलमाल करण्यात आले होते. हे प्रकरण दाबण्यात आले. ताज्या प्रकरणातही रोख रकमेचा गोलमाल झाल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :raidधाडPoliceपोलिस