वर्धा मार्गावरील धाब्यावर छापा : ११ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:27 AM2020-06-13T00:27:35+5:302020-06-13T00:29:28+5:30

गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने वर्धा मार्गावरील ग्रीन व्हॅली धाब्यावर छापा घालून येथे सुरू असलेला जुगार अड्डा पकडला. गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि इतर साहित्यासह २६ लाख, ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Raid on Wardha Road: 11 gamblers arrested | वर्धा मार्गावरील धाब्यावर छापा : ११ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक

वर्धा मार्गावरील धाब्यावर छापा : ११ जुगाऱ्यांना रंगेहाथ अटक

Next
ठळक मुद्देरोख आणि साहित्यासह २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पथकाने वर्धा मार्गावरील ग्रीन व्हॅली धाब्यावर छापा घालून येथे सुरू असलेला जुगार अड्डा पकडला. गुरुवारी रात्री केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ११ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि इतर साहित्यासह २६ लाख, ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर वर्धा महामार्गावर ग्रीन व्हॅली ढाबा आहे. येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथक चारचे पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम यांना मिळाली. त्यांनी त्यांचे सहकारी एपीआय दिलीप चंदन, चौगुले आणि अन्य सहकाº­यांसह गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास छापा मारून ११ जणांना पकडले. ते ताश पत्त्यावर पैशाची हार-जीत करत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ३१ हजार, ५०० रुपये रोख, १० मोबाईल तसेच पाच वाहने असा एकूण २६ लाख, ७७ हजार, ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री १० पर्यंत ही कारवाई चालली. शिवराम देवाची भुरे (खापरी), तुषार अनिल पांडे (मनीष नगर), संजय रामदाजी बोरकर (बेलतरोडी), मोरेश्वर संभाजी हजारे (पाचगाव उमरेड), शेखर भैयालाल कुंभरे (सोमलवाडा), प्रशांत चंद्रकांत शहाणे (सोनेगाव), मधुकर चिंतामण कोटरंगे (मनीष नगर), भुनेश्वर बाबुराव कांबळे (चिकना ), मिनालसिंग जयसिंग ठाकुर (नरेंद्र नगर), मनोहर बबन गावत्रे (रघुजीनगर) आणि संदीप अशोक मेश्राम (पेवठा) अशी जुगार अड्ड्यावर सापडलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध हिंगणा पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायदा तसेच साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

Web Title: Raid on Wardha Road: 11 gamblers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.