गावठी दारूभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:12+5:302021-01-08T04:22:12+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : केळवद पोलिसांनी नांदागाेमुख (ता. सावनेर) शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर धाड टाकली. त्यात १६०० ...

गावठी दारूभट्टीवर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : केळवद पोलिसांनी नांदागाेमुख (ता. सावनेर) शिवारात सुरू असलेल्या गावठी दारूभट्टीवर धाड टाकली. त्यात १६०० लिटर माेहफुलाचा सडवा, १२० लिटर माेहफूल रसायन सडवा व दारू गाळण्याचे साहित्य असा एकूण १ लाख ७६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. ४) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
नांदागाेमुख शिवारातील एका शेतात अवैधरीत्या माेहफुलाची गावठी दारूभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती पाेलिसांना मिळाली. त्या आधारे पाेलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता, पाेलिसांना पाहून आराेपी दिलीप संताेष राजपूत रा. पारधीबेडा तिडंगी, केळवद हा पळून गेला. दारूभट्टीवरील १६०० लिटर माेहफुलाचा सडवा, १२० लिटर माेहफूल रसायन सडवा, १०० किलाे माेहफूल आणि दारू गाळण्याचे इतर साहित्य असा एकूण १ लाख ७६ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी केळवद पाेलिसांनी आराेपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. ही कारवाई ठाणेदार दिलीप ठाकूर, सहायक फाैजदार अमरदीप कामठे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.