शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

गंगा जमुनाजवळ धाड, देहव्यापाराच्या दलदलीतून दोन राजस्थानी मुलींची सुटका

By योगेश पांडे | Updated: April 20, 2023 16:40 IST

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : शहरातील वारांगनाची वस्ती असलेल्या गंगा जमुना परिसराजवळ धाड टाकत पोलिसांनी देहव्यापाराच्या अड्ड्याचा भंडाफोड केला आहे. यात पोलिसांनी देहव्यापाराच्या दलदलीतून राजस्थानमधील दोन मुलींची सुटका केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

गंगा जमुनाजवळील बागडे गल्ली येथे एका घरी रैना बिसन उचिया (३०, बदनापुरा, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) हि भाड्याने राहत होता. तेथेच तिने देहव्यापाराचा अड्डा बनविला. ती गरीब मुलींना जाळ्यात ओढून पैशांचे आमिष दाखवायची व त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायची. फ्रिडम फर्म या संघटनेचे लायझन ऑफिसर अशोककुमार सिंग (५०, सावनेर) यांना याबाबत माहिती मिळाली व त्यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना कळविले.

सुदर्शन यांच्या सूचनेवरून त्यांनी यासंदर्भात लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता २१ व २२ वर्षांच्या दोन मुली देहव्यापार करताना आढळून आल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली व उचियाला अटक केली. पोलिसांनी रैना उचियाविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही मुली राजस्थानमधील असून त्या गरीब कुटुंबातील आहेत. त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून उचिया त्यांना जाळ्यात ओढायची.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSex Racketसेक्स रॅकेटnagpurनागपूरProstitutionवेश्याव्यवसायraidधाड