लकडगंजमधील मटका अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:07 IST2021-05-23T04:07:40+5:302021-05-23T04:07:40+5:30
रोख आणि साहित्य जप्त : गुन्हे शाखेची कारवाई नागपूर : गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी लकडगंज पोलीस ...

लकडगंजमधील मटका अड्ड्यावर छापा
रोख आणि साहित्य जप्त : गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मटका अड्ड्यावर छापा घातला. हा मटका अड्डा चालवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम तसेच साहित्य जप्त करण्यात आले. लकडगंज मधील सतनामी नगरात आरोपी संदीप सूर्यभान शंभरकर हा अनेक दिवसापासून प्रभात मटका चालवीत होता. त्याच्या अड्ड्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनचे शाम कडू यांना मिळाली. कडू यांना आपल्या वरिष्ठांना ती कळविली. पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांनी सापळा रचला आणि सहायक निरीक्षक मोरे, हवालदार श्याम अंगथुलवार, शाम कडू, प्रशांत लांडे, नायक प्रवीण गोरटे, संदीप मावळकर आणि विशाल रोकडे यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० ला छापा घातला. येथे आरोपी संदीप शंभरकर लोकांकडून मटक्याचे आकडे लिहून खायवाडी करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून पाच हजार सहाशे रुपये तसेच मटक्याचे साहित्य असा एकूण १५,६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
---