नागपुरात मटका अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:40 IST2021-02-16T00:39:37+5:302021-02-16T00:40:47+5:30
Raid on Matka den, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने चिंतामणनगर भिवसनखोरी येथील मटका अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घातला.

नागपुरात मटका अड्ड्यावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने चिंतामणनगर भिवसनखोरी येथील मटका अड्ड्यावर सोमवारी दुपारी छापा घातला. या छाप्यात आरोपी शैलेष बुद्धाजी गेडाम (वय ४०, रा. भिवसनखोरी), गोरेलाल रामाधीन शाहू (वय ३०, रा. गंगानगर) आणि दीपक लक्ष्मणसिंग कुशवाह (वय ३०, रा. आठवा मैल दवलामेटी) तेथे कल्याण नावाचा मटका (सट्टा) अड्डा चालवित असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १२, १०० रुपये तसेच मटक्याचे साहित्य जप्त केले. विशेष म्हणजे, तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध अशीच मटक्याची कारवाई झालेली आहे.