माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:08 IST2021-05-20T04:08:31+5:302021-05-20T04:08:31+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क पवनी (रामटेक) : देवलापार पाेलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून अवैधरीत्या दारू गाळणाऱ्या ...

Raid on Maehfula brewery | माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड

माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड

लाेकमत न्यूज नेटवर्क

पवनी (रामटेक) : देवलापार पाेलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या माेहफुलाच्या दारूभट्टीवर धाड टाकून अवैधरीत्या दारू गाळणाऱ्या व विक्री करणाऱ्या चाैघांना अटक केली. त्यांच्याकडून माेहफुलाच्या दारूसह १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कट्टा, सावगी, कडबीखेडा व रयतवाडी शिवारात साेमवारी (दि.१७) करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये सदू उईके रा. रयतवाडी, किसन वरखडे रा. सावरा, राजू खंडाते रा. कट्टा व बापूराव वरठी रा. सावगी यांचा समावेश आहे. काेराेना पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना ग्रामीण भागात अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. परिसरातील कट्टा, सावगी, कडबीखेडा व रयतवाडी शिवारात माेहफुलाची दारूभट्टी चालवून अवैध विक्री केली जात असल्याची गुप्त सूचना देवलापार पाेलिसांना मिळाली. त्याआधारे पाेलिसांनी चारही शिवारात पाहणी करीत दारूभट्टीवर धाड टाकली असता, आराेपी माेहफुलाची दारू गाळताना आढळून आले. पाेलिसांनी आराेपींना ताब्यात घेत अटक केली असून, त्यांच्याकडून माेहफुलाची दारू, रसायन सडवा व दारू गाळण्याचे इतर साहित्य असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी देवलापार पाेलिसांनी आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार प्रवीण बाेरकुटे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक केशव पुंजरवाड, महिला उपनिरीक्षक लक्ष्मी घाेडके, पाेलीस नाईक संदीप नागाेसे, दिलीप टेकाम, राकेश नागुलवार, सचिन डायलकर, प्रवीण खंडारे, संताेष वाट, अमाेल वाघ, अमाेल चिकने यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on Maehfula brewery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.