नागपूरच्या यशोधरानगरातील हुक्का पार्लरवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:28 IST2018-03-12T23:27:58+5:302018-03-12T23:28:13+5:30
यशोधरानगरातील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये छापा घालून पोलिसांनी तेथून ३८ जणांना अटक केली.

नागपूरच्या यशोधरानगरातील हुक्का पार्लरवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यशोधरानगरातील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये छापा घालून पोलिसांनी तेथून ३८ जणांना अटक केली. रविवारी पहाटेला डीसीपी सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगरचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
मोहित गुप्ता नामक व्यक्तीच्या इमारतीत रॉनी मायकेल नामक आरोपी हुक्का पार्लर चालवीत असल्याची माहिती पोलिसांना रविवारी पहाटे मिळाली. तेथे मोठ्या संख्येत हुक्का शौकिन बसून धूर उडवत असल्याचेही पोलिसांना समजले. त्यावरून डीसीपी बावचे यांनी यशोधरानगर पोलिसांना सोबत घेऊन पार्लरवर छापा घातला. तेथे सुमारे ३८ जण हुक्क्याचा धूर उडवताना आढळले. पोलिसांनी त्यांना तसेच हुक्का पार्लरच्या खाली असलेल्या तीन कार, दोन डझनपेक्षा जास्त दुचाकी आणि हुक्क्यासह सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
येथून पोलिसांनी हुक्का पार्लरचा संचालक रॉनी रेमंड मायकल, पील दानेश खुशलानी, आशिष बालानी, इमरान शेख, रोहित शुकरानी, विक्रम तलरेजा, जफर कलीम, सुफीयान अनम, दीपेश कटारिया, मनीष तेजवानी, आकाश उत्तमचंदानी, जलत ग्यानचंदानी, हितेश जेठानी, वारिस अख्तर, जय वासवानी, प्रणय रंगारी, साहिल तांबे, नेल्सन सयाम, धीरज हरचंदानी, मनीष वासवानी, दिलीप कुकरेजा, मोहम्मद जुबेर, शेख गुलाम, गुफरान मोहम्मद, अरबाज अहमद, मोहम्मद सोहेल, मोहम्मद फहीम, कुमार रूपवानी, कमल लालवानी, अनस शफी, मोहम्मद शाकीब, फहीमुद्दीन सय्यद, हसनकाजी फजलू, किशोर बनवानी, पंकज पंजवानी आणि हितेश देवानी यांना ताब्यात घेतले.
बाहेर कुलूप आतमध्ये गोंधळ
विशेष म्हणजे, हुक्का पार्लरच्या संचालकाने या इमारतीत प्रवेश करणाऱ्या दारावर बाहेरून कुलूप लावले होते. जेथे हुक्का पार्लरचा धूर उडवला जात होता त्या हॉलच्या सर्व दारांना बाहेरून कुलूप होते. त्यामुळे पोलीस चक्रावले. मात्र, माहिती पक्की असल्याने बाजूच्या इमारतीवरून पोलीस या इमारतीच्या टेरेसवर चढले. तेथून तिसऱ्या माळ्यावर उतरले आणि बंद दाराच्या खोलीच्या खिडकीला कूलर लावून होता. तो सुरू असल्याचे पाहून पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे ते दार उघडताच आतमध्ये हुक्का पार्लर अन् तेथे गोंधळ सुरू असल्याचे पोलिसांना दिसले.