शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  बुकी अजय राऊतच्या घरी छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:47 IST

शहरातून गोवा, दुबई, बँकाँकपर्यंत क्रिकेट सट्टयाचे रॅकेट चालविणा-या नव्या - जुन्या बुकींनी आता शहराबाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये क्रिकेट अड्डे सुरू केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने खरे टाऊनमधील कुख्यात बुकी अजय राऊतच्या घरी छापा मारून त्याच्या मुलाला अटक केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.

ठळक मुद्देक्रिकेट सट्टयाचे अड्डे पुन्हा शहरात : नाट्यमय कारवाईनंतर खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातून गोवा, दुबई, बँकाँकपर्यंत क्रिकेट सट्टयाचे रॅकेट चालविणा-या नव्या - जुन्या बुकींनी आता शहराबाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये क्रिकेट अड्डे सुरू केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने खरे टाऊनमधील कुख्यात बुकी अजय राऊतच्या घरी छापा मारून त्याच्या मुलाला अटक केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.नागपूर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकींचे महत्वाचे सेंटर आहे. ५०० पेक्षा छोटे मोठे बुकी येथे कोट्यवधींची खयवाडी करतात. पोलिसांना त्याची चांगली माहिती आहे. बड्या बुकींचे अड्डे बिनबोभाट सुरू आहेत. पोलीस अधून मधून छोट्या बुकींच्या अड्डयावर छापा मारून सक्रीयता दाखवतात. एकदा एखाद्या बुकीकडे कारवाई झाली की त्याच्याकडे नंतर अपवादानेच कारवाई होते. शहरातील जुना आणि मोठा बुकी म्हणून अजय राऊतचे नाव आहे. कुख्यात गुंड राजू भद्र्रे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी अजयचे दीड कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. तेव्हापासून अजयचे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर अधोरेखित झाले होते. गेल्या काही दिवसांपासून अजयची प्रकृती चांगली नसल्याने त्याचे खरे टाऊनमधील घरीच त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या क्रिकेट सट्टयाची सूत्रे त्याचा मुलगा अजिंक्यने सांभाळल्याची माहिती गुन्हे शाखेला शनिवारी कळली. त्यावरून पोलिसांनीसापळा रचला. त्यानुसार, गुन्हे शाखेची महिला पोलीस कर्मचारी केअर टेकर म्हणून अजय राऊतच्या घरी गेली. दार उघडताच पोलिसांनी आत धडक दिली. आतमध्ये अजयचा मुलगा अजिंक्य (वय २१), पुतण्या निखिल मनोज राऊत (वय ३०) तसेच संजय मारोतराव खरवडे आणि रोहित घनश्याम खोब्रागडे (वय २४) चेन्नई सुपर किंग विरुद्ध किंग्स एलेवन पंजाब क्रिकेट सामन्यावर खयवाडी करताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख, मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपसह २ लाख, ३३ हजारांचा ऐवज जप्त केला. दोन वर्षांपूर्वी धडाकेबाज कारवायामुळे बुकींनी आपले बस्तान शहराबाहेर तसेच भंडारा, गोंदियाकडे हलविले होते. या नाट्यमय कारवाईनंतर शहरातील जुन्या बुकींना आता पुन्हा शहरातच आपले अड्डे सुरू केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या कारवाईनंतर बुकी राऊत पिता-पुत्राचे धागेदोरे कोणकोणत्या बुकींसोबत जुळले आहे, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :raidधाडCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीnagpurनागपूर