नागपूरच्या गाेकुळपेठेतील हुक्का पार्लरवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 00:08 IST2021-02-26T00:07:03+5:302021-02-26T00:08:43+5:30
अंबाझरी पाेलीस स्टेशनअंतर्गत लक्ष्मीभुवन चाैक, गाेकुळपेठ येथील एसीई कॅफेत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून १२ आराेपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नागपूरच्या गाेकुळपेठेतील हुक्का पार्लरवर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंबाझरी पाेलीस स्टेशनअंतर्गत लक्ष्मीभुवन चाैक, गाेकुळपेठ येथील एसीई कॅफेत सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून १२ आराेपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिमंडळ-२ च्या विशेष पथकाने ही कारवार्ई केली. या कारवाईत पार्लरमधून हुक्का पाॅट, फ्लेर्व्हस व इतर साहित्यांसह १ लाख २९ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. शहरात काेराेना संक्रमण वाढत असल्याने शासकीय प्रतिबंध असताना या कॅफेमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्यादरम्यान ग्राहकांना जमा करून हुक्का उपलब्ध करून दिला गेला. ही माहिती मिळताच दबा धरून असलेल्या पथकाने धाड घातली आणि तीन अल्पवयीनांसह हुक्का पित असलेल्या १२ आराेपींना ताब्यात घेतले. आराेपींमध्ये निमिष बिसानी (वय २३, रा. सीताबर्डी), मुंदिका सोंधिया (२५, रा. गार्डलाइन, मोमिनपुरा), प्रथम उइके (१८, रा. तुकडोजीनगर, हिंगणा), शुभम देशमुख (२०, संजयनगर, पांढराबोड़ी), सचिन भांडे (२२, रामनगर), आबास क्षीरसागर (२१, रामनगर), आदित्य जैन (१८, शहीद चौक), पीयूष मकानी (१८, लकड़गंज, गार्डन), मो. इब्राहिम आसिफ मो. शोएब (२३, रामसुमेरनगर), पवन तड़से (१८, सतरंजीपुरा), तन्मय तेलरांधे (१९, महाल) यांचा समावेश आहे. ही कारवाई एपीआय दिलीप चंदन, पीएसआय घुगे, राजेश सोनवने, अमित कुमार सिंहल, पराग फेगडे, आलीम खान यांनी केली.