नागपुरातील तवक्कल हॉलमधील जुगार अड्डयावर छापा : २६ जुगारी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 00:19 IST2021-02-16T00:17:33+5:302021-02-16T00:19:35+5:30
Raid on gambling den तहसील पोलिसांनी शनिवारी रात्री ९ च्या सुमारास नालसाहेब चौकाजवळच्या तवक्कल हॉलमधील जुगार अड्डयावर छापा मारला. येथे जुगार खेळत असलेल्या २६ जणांना पोलिसांनी अटक केली.

नागपुरातील तवक्कल हॉलमधील जुगार अड्डयावर छापा : २६ जुगारी जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - तहसील पोलिसांनी शनिवारी रात्री ९ च्या सुमारास नालसाहेब चौकाजवळच्या तवक्कल हॉलमधील जुगार अड्डयावर छापा मारला. येथे जुगार खेळत असलेल्या २६ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख ७२ हजार आणि जुगाराच्या साहित्यासह १ लाख ४५ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले.
तवक्कल हॉलमध्ये मोठा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शनिवारी रात्री तेथे छापा मारला. यावेळी तेथे आरोपी अब्दुल तनवीर मजीद (रा. गांजाखेत चौक), शुभम मोहंदे (साईबाबानगर), समीर शेख वकील अहमद, अजहर जफर अहमद (गांजाखेत चौक), शेख शाहिद सलीम (महाल), शाहरुख हनीफ दुम्बा (शांतिनगर), अब्दुल साजिद माजिद (गांजाखेत), इरशाद शेख अयुब (महेशनगर), शफीकुर रफीक रहमान (सतरंजीपुरा), मोहम्मद वाहिद शेख असलम (कावरापेठ), सरफराज शेख अयुब (महेशनगर), शहजाद कादर अहमद कुरेशी (सेवासदन चौक), शेख सलीम नबी (सतरंजीपुरा), सरबाज रियाज अहमद (महाल), मोहम्मद फैज फजल शेख (सतरंजीपुरा), इकरार अहमद अब्दुला गफार (भालदारपुरा), नयाज सैयद अली (महाल), मोहम्मद इमरान इस्माईल (सतरंजीपुरा), अब्दुल कदीर वहिद (रा. कामठी रोड, एचबी टाउन), शेख रफीक कदीर (डोबीनगर), अब्दुल अजीज रशीद (शिवाजी नाईट स्कूलजवळ), इरफान मेहमूद खान (गांजाखेत), शेख असलम हारून (भालदारपुरा), अंगद शत्रुघ्न यादव (ईतवारी), शाहरुख शादिक शेख (लोधीपुरा) हे जुगार खेळताना सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून ७२ हजार रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जयेश भंडारकर, निरीक्षक बळीरामसिंग परदेशी, उपिनरीक्षक गणेश काळे, हवलदार समीर शेख, नाजिर शेख, सचिन नितवने, प्रवीण लांडगे, हेमंत पराते आणि दिनेश कुशवाह यांनी ही कामगिरी बजावली.