नागपुरात जुगार अड्ड्यावर छापा : १६ जुगारी सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 20:44 IST2021-04-29T20:42:52+5:302021-04-29T20:44:04+5:30
Raid on gambling den, crime news वाठोड्यातील बाबा फरीदनगरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी छापा घालून १६ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून २९ हजार रुपये रोख, मोबाइल आणि इतर साहित्यासह एक लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

नागपुरात जुगार अड्ड्यावर छापा : १६ जुगारी सापडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोड्यातील बाबा फरीदनगरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी छापा घालून १६ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून २९ हजार रुपये रोख, मोबाइल आणि इतर साहित्यासह एक लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
बाबा फरीदनगरातील मोहम्मद नदीम नामक आरोपीच्या घरी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती वाठोडा पोलिसांना मिळाली होती. त्यावरून बुधवारी ठाणेदार आशालता खापरे यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी नदीमच्या घरी छापा घातला. त्याच्या टेरेसवर जुगार अड्डा सुरू होता. येथे आरोपी शैलेश प्रमोद मेश्राम, रोशन रमेश मोरे, पवन शंकरराव चकोले, निखिल दिलीपराव गायकवाड, मोहम्मद इर्शाद मोहम्मद अयुब, लोकेश जगराम बाहेश्वर, शेख इम्रान शेख हारुण, मोहम्मद अशरद अशरफ अन्सारी, किशोर मुनिराज ठवरे, प्रतीक अरविंद चवरे, अक्षय प्रकाश रंगारी, करण सुंदरलाल शेषकर, मोहम्मद नदीम मोहम्मद इब्राहिम, राहुल राजू कावळे, हितेश सूर्यनंदन सहारे आणि गौरव श्रीराम मानमोडे हे ताशपत्त्यावर जुगार खेळताना आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाइल तसेच इतर साहित्यासह एक लाख ७७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.