क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:11 IST2021-05-05T04:11:49+5:302021-05-05T04:11:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बिचवा-वरपाणी मार्गालगतच्या शेतात स्वीकारल्या ...

क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बिचवा-वरपाणी मार्गालगतच्या शेतात स्वीकारल्या जाणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यावरील सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. यात सहा जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण १ लाख ९० हजार ३३९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. २) सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये कार्तिक गणेश भट (२८), रितेश कृष्णा ठाकरे (३५), पवन पुरुषाेत्तम इंगळे (३०), श्रीकांत गणेश भट (३२) चाैघेही रा. झिंगाबाई टाकळी, नागपूर, ईशांत इर्शाद खान (२८, रा. जाफरनगर, नागपूर) व आशिष लक्ष्मण गाेयले (२७, रा. काेराडी नाका चाैक, नागपूर) या सहा जणांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खापा परिसरात गस्तीवर असताना त्यांना बिचवा-वरपाणी मार्गालगतच्या शेतातील घरी आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) क्रिकेट सामन्यावर सट्टा स्वीकारला जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी आराेपीपैकी एकाशी फाेनवर संपर्क साधला. ते सनरायझर हैदराबादविरुद्ध राजस्थान राॅयल्स संघादरम्यान खेळल्या जात असलेल्या सामन्यावर सट्टा स्वीकारत असल्याचे स्पष्ट हाेताच या पथकाने लगेच धाड टाकली.
यात सट्टा स्वीकारणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक एलसीडी टीव्ही, १२ माेबाईल हॅण्डसेट, सट्टा नमूद करण्याचे साहित्य व ९,१४० रुपये राेख असा एकूण १ लाख ९० हजार ३३९ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, उपनिरीक्षक सचिन मत्ते, सहायक फाैजदार साहेबराव बहाळे, हेड काॅन्स्टेबल नाना राऊत, राजेंद्र रेवतकर, राेहन डाखाेरे, विपीन गायधने, अमाेल वाघ, नम्रता बघेल यांच्या पथकाने केली. याप्रकरणी खापा पाेलिसांनी मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.