शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नागपूरच्या लकडगंज भागातील कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:11 AM

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी लकडगंजमधील एका कुंटणखान्यावर छापा घालून सात महिलांना वेश्याव्यवसाय करताना ताब्यात घेतले.

ठळक मुद्देसात वारांगनांसह पाच ग्राहकही सापडले : सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने गुरुवारी लकडगंजमधील एका कुंटणखान्यावर छापा घालून सात महिलांना वेश्याव्यवसाय करताना ताब्यात घेतले. आपल्याकडून हा गोरखधंदा आशा केसिया नामक महिला करवून घेत असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे पोलिसांनी त्यांची सुटका केली. तर, आशा केसिया तसेच कुंटणखान्यावर सापडलेल्या पाच ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.गंगाजमुना परिसरात आशा केसिया अनेक वर्षांपासून कुंटणखाना चालवित होती. मध्यंतरी पोलिसांनी छापासत्र सुरू केल्याने तिने तेथून पळ काढला होता. गेल्या काही दिवसांपासून आशाने परत तेथे कुंटणखाना सुरू केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक अमिता जयपूरकर, संजीवनी थोरात, एएसआय पांडुरंग निकुरे, अजय जाधव, विजय गायकवाड, दामोदर राजुरकर, संगीता तिडके, छाया राऊत, साधना चव्हाण अनिल दुबे, भीमराव मेश्राम, गणेश बांबडेकर तसेच प्रेमलता भालेराव आणि राणी कळमकर यांनी आशाच्या कुंटणखान्यावर गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास छापा घातला. यावेळी आशा पळून गेली. तर, महिलांसोबत नको त्या अवस्थेत ग्राहक आढळले. त्यात मध्य प्रदेशातील लखनादोहचा पवनकुमार ऊर्फ हालकू छबीलाल अहिर (वय २२) तसेच नागपुरातील सुमित सुधाकर आत्राम, (वय २१), भूपेंद्र गंगाराम वर्मा (वय २१)आतिश दिलीप घोळके (वय २५) आणि दीपक संतोष जयस्वाल (वय १९) या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.वारांगनांची सुटका, ग्राहकांवर गुन्हादेहविक्रय करणाऱ्या    महिलांची पोलिसांनी सुटका केली. मात्र, त्यांना पैश्याचे प्रलोभन देऊन ग्राहकांसमोर हजर करणाऱ्या    आशा केसिया आणि पकडलेल्या आरोपींविरुद्ध लकडगंज ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३७०, ३४ तसेच सहकलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल केला.

 

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcrimeगुन्हे