राहुल सोलापूरकर पुरावे द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा; धर्मपाल मेश्राम यांचा इशारा

By योगेश पांडे | Updated: February 11, 2025 22:29 IST2025-02-11T22:28:52+5:302025-02-11T22:29:12+5:30

अनुसूचित जाती जमाती आयोगाकडून गंभीर दखल

Rahul Solapurkar, provide evidence or face action; Dharmapal Meshram warns | राहुल सोलापूरकर पुरावे द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा; धर्मपाल मेश्राम यांचा इशारा

राहुल सोलापूरकर पुरावे द्या अन्यथा कारवाईला सामोरे जा; धर्मपाल मेश्राम यांचा इशारा


नागपूर : लेखक, दिग्दर्शक व कलाकार राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून राजकारण तापले आहे. चहुबाजूंनी त्यांच्यावर टीका होत असून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडूनदेखील या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली आहे. राहुल सोलापूरकर यांनी पुरावे द्यावे अन्यथा कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराच अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.

राहुल सोलापूरकर यांनी वेदांचा संदर्भ देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण असल्याबाबत केलेल्या वक्तव्याचे वृत्त वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवर प्रकाशित आणि प्रसारित झाले. तशा पद्धतीच्या मौखिक आणि दूरध्वनीद्वारे तक्रारी अनुसूचित जाती जमाती आयोगाला प्राप्त झाल्या. त्याबाबत सोलापूरकर यांना आयोगाने नोटीस बजावून विचारणा केली आहे. त्यांनी दिलेले संदर्भ त्यांनी दिलेल्या संदर्भांबाबत काही पुरावे, लिखाण असल्यास ते आयोगाच्या पुढे करावे. सोलापूरकर यांनी तसे वक्तव्य करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे आणि या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भात तात्काळ खुलासा करावा, अशा सूचना ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केल्या आहेत. सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदांना मानणारे आणि ब्राम्हण होते, असे विधान केले. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. सोलापूरकर यांनी बाबासाहेबांच्या ब्राम्हण असण्याबाबत संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे, अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, अशी भूमिका ॲड. मेश्राम यांनी मांडली आहे.

Web Title: Rahul Solapurkar, provide evidence or face action; Dharmapal Meshram warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर