शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी अपरिवक्व नेते, दलित-आदिवासींची करत आहेत दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:46 IST

किरण रिजीजूंचा आरोप : कॉंग्रेस म्हणजे खोटे आश्वासन देणारी फॅक्टरीच

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :राहुल गांधी इतकी वर्षे राजकारणात आहेत. मात्र त्यांना अद्यापदेखील दलित किंवा आदिवासी समाजाबाबत फारशी माहिती नाही. निवडणूक आली की वेगवेगळे पब्लिसिटी स्टंट ते करत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांनी नेहमीच आदिवासी व दलितांची दिशाभूल केली आहे. ते अद्यापही अपरिपक्व नेतेच आहेत, असा आरोप केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनी लावला. नागपुरात शनिवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

आज कॉंग्रेस व महाविकासआघाडीचे नेते संविधान हाती घेऊन प्रचार करत आहेत व भाजपवर आरोप करत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पुढाकारामुळे २६ नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून साजरा करणे सुरू झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना हरविण्यासाठी कॉंग्रेसनेच षडयंत्र केले होते. त्यांचा कॉंग्रेसने नेहमीच अपमान केला. मात्र मतांच्या राजकारणासाठी आता कॉंग्रेस संविधानप्रेमी असल्याचे नाटक करत आहेत. कॉंग्रेस नेत्यांनीच नेहमी आरक्षणाला विरोध केला आहे, असा दावा किरण रिजीजू यांनी केला. संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिजननुसार संविधान तयार करण्याच्या प्रक्रियेवर एक ग्रंथ केंद्र सरकार काढणार आहे. त्यात कॉंग्रेसने केलेल्या विरोधांचे रेकॉर्डदेखील असतील व जनतेसमोर यातून सत्य आणण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.

संसदेतील भाषणांचा दर्जा घसरलाएक काळ होता जेव्हा कॉंग्रेसमधूनदेखील संसदेत अतिशय सखोल व अभ्यासपूर्ण भाषणे व्हायची. मात्र राहुल गांधी संसदेत आल्यापासून भाषणांचा व चर्चांचा दर्जा घसरला आहे. त्यांचा स्वत:चा काहीच अभ्यास नसतो. कुणीतरी लिहून दिलेले भाषण ते वाचतात. कॉंग्रेसमधील जे अभ्यासू खासदार आहेत, त्यांना भितीपोटी हवे तसे भाषण करता येत नाही, असा दावा रिजीजू यांनी केला.

८० टक्के मुस्लिमांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार आहे. याबाबत विविध पातळ्यांवर मुस्लिम संघटना, महिला संघटनांशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के मुस्लिमांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे. वक्फच्या नावाखाली कोट्यवधींच्या जमिनी लॅंड माफियांनीच गिळंकृत केल्या आहेत. त्याचा गरीबांना कुठलाही फायदा झालेला नाही. या विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर या जमिनींचा मुस्लिम समाजातील मुले, तरुण, महिला यांच्या विकासासाठीच उपयोग करण्यात येईल, असे रिजीजू यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीnagpurनागपूर