आधारकार्ड अपडेटसाठी सकाळी सातपासून रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:54 IST2021-02-05T04:54:51+5:302021-02-05T04:54:51+5:30
नागपूर : आधारकार्डावर आपली माहिती अपडेट करण्यासाठी नागरिक सकाळी सात वाजताच जीपीओ कार्यालयात रांगेत उभे राहतात; परंतु अनेक नागरिकांच्या ...

आधारकार्ड अपडेटसाठी सकाळी सातपासून रांगा
नागपूर : आधारकार्डावर आपली माहिती अपडेट करण्यासाठी नागरिक सकाळी सात वाजताच जीपीओ कार्यालयात रांगेत उभे राहतात; परंतु अनेक नागरिकांच्या पदरी निराशा पडत आहे. आधारकार्डात आपले नाव, फोटो, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आणि बायोमेट्रिक, आदी माहिती अपडेट करण्यासाठी आधी टोकन घ्यावे लागते. त्यातही वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. केवळ ९ ते १० टोकन वाटण्यात येतात. त्यात ज्यांचा क्रमांक लागला त्यांचेच आधारकार्ड अपडेट होते. टोकन मिळूनही उशीर झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी रांगेत लागून टोकन घ्यावे लागत आहे.
...........
एका वेळी दोन बाबीच होतात अपडेट
आधारकार्ड अपडेट करण्यासाठी धावपळ करूनही एका वेळी केवळ दोन बाबीच अपडेट होऊ शकतात. त्यानंतर नवे आधारकार्ड महिन्याभरानंतर मिळते. दुसरी माहिती बदलविण्यासाठी पुन्हा तीच प्रक्रिया पार पाडावी लागते.
नोकरी करणाऱ्या महिलांना त्रास
सकाळपासून रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना त्रास होतो. घर आणि कार्यालय अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या जानकी नावाच्या महिलेने सांगितले की, त्यांना आधारकार्डावर जन्मतारीख बदलायची आहे. जीपीओ कार्यालयात त्या दोन दिवसांपासून येत आहेत; परंतु त्यांचे काम झालेले नाही. त्यांना जन्मतारखेत बदल करण्यासाठी ज्या कागदपत्रांची गरज आहे त्याची माहिती नसल्यामुळे त्यांना पुन्हा रांगेत उभे राहावे लागले. तेथे कागदपत्रांची माहिती देण्यासाठीही कोणीच नसते.
............