शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पारडी उड्डाणपुलाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह : बांधकामाची गती संथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 9:28 PM

पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिक बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. बांधकाम केव्हा पूर्ण होणार आणि या मार्गावर निरंतर होणाऱ्या अपघातात आणखी किती जणांचा बळी जाणार, या प्रश्नावर नागरिक संतप्त आहेत.

ठळक मुद्दे‘एनएचएआय’ने पुढाकार घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारडी उड्डाण पुलाचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे (एनएचएआय) करण्यात येत आहे. बांधकामाची गती संथ असतानाही ‘एनएचएआय’चे अधिकारी कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. भूमिपूजनापासून आजपर्यंत या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. नागरिक बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. बांधकाम केव्हा पूर्ण होणार आणि या मार्गावर निरंतर होणाऱ्या अपघातात आणखी किती जणांचा बळी जाणार, या प्रश्नावर नागरिक संतप्त आहेत. 

ऑगस्ट २०१४ मध्ये भूमिपूजनसन २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कस्तूरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पारडी अंडरब्रीजचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रकल्पाला उड्डाणपुलामध्ये रूपांतरित करण्यात आले होते. भूमिपूजनाला पाच वर्षे पूर्ण झाली असून अजूनही पुलाचे काम अपूर्ण आहे. बांधकामाचे चुकीचे नियोजन आणि संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामामुळे या भागातील नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. बांधकाम सुरू असताना अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्याचा एनएचएआय आणि लोकप्रतिनिधींवर काहीही परिणाम झालेला नाही.बांधकाम जीडीसीएल व एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करीत आहे. उड्डाणपुलाचे बांधकाम संथगतीने सुरू असल्यावर विविध पक्ष आणि नागरिक संघटनांनी अनेकदा आंदोलन केले आहेत. बरेचदा महामार्गावरील वाहतूक थांबविली होती. भंडारा रोडवर दोन्ही बाजूला लोखंडी कठडे लावण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातून वाहन काढणे अत्यंत जोखिमेचे काम आहे. रस्त्यावरून पायदळ चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. पारडी उड्डाण पुलाच्या अपूर्ण विकासकामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाºयांना फटकारले आहे. पण कारणे सांगून मंत्र्याच्या आदेशाकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य 
सदर प्रतिनिधीने कळमना मार्ग आणि भंडारा महामार्गावरील उड्डाण पुलाची पाहणी केली असता बांधकाम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार नाहीच, अशी स्थिती आहे. कळमना मार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पारडी चौकातून कळमना मार्केटकडे जाणारा एक बाजूचा रस्ता बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला आहे. या मार्गावर सिमेंट रस्त्याचे काम एक वर्षापासून सुरू आहे. जड वाहतुकीमुळे रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून ट्रकची वाहतूक असल्यामुळे धूळ उडते. दुचाकी वाहनचालकांना थोडावेळ थांबूनच जावे लागते.पारडी चौकापासून भंडारा महामार्गावर जवळपास एक कि़मी. अंतरावर पूनापूर मंदिराकडे जाणाºया वळण रस्त्यापर्यंत बांधकामाच्या दोन्ही बाजूला बॅॅरिकेट्स लावले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच अतिक्रमणाची भर पडली आहे. त्यामुळे १२ मे रोजी एका डम्परच्या धडकेत दोन सख्या बहिणींचा अपघातात मृत्यू झाला होता. उड्डाण पुलासाठी उभारण्यात आलेले पिल्लर अर्धवट आहेत. या महामार्गावर जड वाहनांची वाहतूक निरंतर सुरू असते. हा मार्ग गंभीर अपघातासाठी ओळखला जातो. बांधकाम पूर्ण करून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.उड्डाण पुलाची वैशिष्ट्ये

  •  ३१ ऑगस्ट २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन.
  •  ४४८ कोटींची गुंतवणूक.
  •  मार्च २०१६ मध्ये काम सुरू.
  •  मार्च २०१९ मध्ये बांधकाम पूर्णत्वाचे लक्ष्य.
  •  डिसेंबर २०१८ मध्ये ३० टक्के बांधकाम.

डिसेंबर २०२० पर्यंत काम पूर्ण होणारपारडी आणि कळमना उड्डाण पुलाचे बांधकाम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. पारडी नाका ते इतवारी जैन मंदिर, वैष्णोदेवी चौक, कळमना मार्केट येथे उड्डाण पूल होणार आहे. सध्या बांधकाम वेगात सुरू आहे. प्रकल्पासाठी हवी असलेली जागा मनपाने एनएचएआयला अजूनही हस्तांतरित केलेली नाही.नीलेश येवतकर, प्रकल्प संचालक (पीआययू-१),राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.

टॅग्स :nagpurनागपूरhighwayमहामार्ग