शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लक्षणे नसलेल्यांचे आता घरीच विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 10:04 PM

‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता, यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने स्थानिक स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

ठळक मुद्देआरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी : रोगप्रतिकारक क्षमता नसलेले रुग्ण पात्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या आणि उपलब्ध संसाधनांची मर्यादा लक्षात घेता, यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे. यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७ जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने स्थानिक स्तरावर मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रचलित मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रतिबंधित कालावधीमध्ये रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या लक्षणांनुसार लक्षणे नसलेले, सौम्य वा अतिसौम्य लक्षणे, मध्यम तीव्र लक्षणे व तीव्र अशा तीन लक्षणांमध्ये वर्गीकृत केले आहे. त्यानुसार रुग्णांना अनुक्रमे ‘कोविड केअर सेंटर’, ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर’ आणि ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’ येथे दाखल करावयाचे आहे. मात्र यापुढे लक्षणे नसलेल्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना जर त्यांच्या घरामध्ये योग्यप्रकारे सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.काय आहेत मार्गदर्शक सूचना?वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णास लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित केलेले असावे.संबंधित रुग्णाच्या घरी अलगीकरणासाठी योग्य सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात.गंभीर आजार असलेले व ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेले गृह विलगीकरणाकरिता पात्र राहणार नाहीत.वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार काळजीवाहू व्यक्ती व सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ची मात्रा घ्यावी लागेल.मोबाईलवर आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावे व ते सतत ‘अ‍ॅक्टिव्ह’ असेल याविषयी दक्ष राहावे.रुग्णांना स्वत:चे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागेल.उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी गृह विलगीकरणासाठी अनुमती देण्यापूर्वी तपासणी करावी.निकटवर्तीयांना घरी करावयाच्या अलगीकरणासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचनाhttps://www.mofhw.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.गृह विलगीकरण कधीपर्यंत राहील?गृह विलगीकरणाखाली ठेवलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १० दिवसांनी आणि तीन दिवस ताप नसल्यास गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्यानंतर रुग्णाला पुढील सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याबद्दल व प्रकृतीचे स्वपरीक्षण करण्याबद्दल सल्ला देण्यात येईल. गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर परत कोविड-१९ साठी चाचणी करण्याची आवश्यकता नाही.वैद्यकीय मदत कधी घ्यावी?गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने स्वत: व काळजीवाहू व्यक्तींनी त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. धाप लागणे, श्वासोच्छ्वासास अडथळा निर्माण होणे, ‘आॅक्सिजन सॅच्युरेशन’मध्ये कमतरता येणे, छातीमध्ये सतत दुखणे, वेदना होणे, संभ्रमावस्था, शुद्ध हरपणे, अस्पष्ट वाचा होणे, झटके येणे, हात किंवा पायामध्ये कमजोरी किंवा बधिरता येणे, ओठ, चेहरा निळसर पडणे आदी गंभीर लक्षणे आढळल्यावर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.आरोग्य यंत्रणेची जबाबदारीगृह विलगीकरणासंदर्भात आरोग्य यंत्रणेची जबाबदारीही स्पष्टपणे नमूद केलेली आहे. मनपाच्या आरोग्य यंत्रणा सर्व रुग्णांचे संनियंत्रण करेल. विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीचे संनियंत्रण कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण चमू प्रत्यक्ष भेटीद्वारे करेल. कॉलसेंटरद्वारे त्याचा पाठपुरावा करेल. रुग्णांच्या प्रकृतीची नोंद कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, कॉलसेंटरमधील कर्मचारी ठेवतील. या रुग्णांची माहिती कोविड-१९ पोर्टल व फॅसिलीट अ‍ॅप यावर टाकण्यात येईल. वरिष्ठ अधिकारी याचे संनियंत्रण करतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर