शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

लोकक्षोभामुळे वानाडोंगरीचे क्वारंटाइन सेंटर हटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 23:38 IST

अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वानाडोंगरी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध, ठिय्या आंदोलन : जिल्हा प्रशासनाला घ्यावा लागला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कोरोना हॉटस्पॉट असलेल्या सतरंजीपुरा भागातील संशयितांना वानाडोंगरीतील क्वारंटाइन सेंटर येथे हलवण्यात आले होते. परंतु याला स्थानिक नागरिकांसह आमदार व त्या भागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध केला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. इतकेच नव्हे तर हे सेंटर नागपुरात हलवण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. अखेर लोकप्रतिनिधींच्या तीव्र विरोधानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला. येथे क्वारंटाइन केलेल्यांना आता शहरातील दुसऱ्या ठिकाणी जिथे जागा उपलब्ध असेल तिथे स्थानांतरित करण्यात येणार आहे.हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी परिसरात सामाजिक न्याय विभागाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह आहे. येथील इमारतीत ३१ खोल्या असून येथे नागपूर शहरातील १२६ जणांना कोरोना विषाणू संशयित म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. ज्यांना येथे क्वारंटाइन करण्यात आले, ते नागपूर शहरातील सतरंजीपुरा परिसरातील लोक होते. सध्या सतरंजीपुरा हा परिसर सर्वाधिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातोय. नागपुरातील अर्ध्यापेक्षा अधिक कोेरोनाच्या केसेस याच परिसरात आढळून आल्या आहेत. त्यामुळे येथील लोकांना हिंगणा येथील वानाडोंगरीत आणले गेल्याची माहिती मिळताच सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. त्यामुळे हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही याला विरोध केला. आ. समीर मेघे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वानाडोंगरी ही नगर परिषद १२०८ हेक्टर क्षेत्रात पसरली असून ५० हजार लोकसंख्येची दाट वसाहत आहे. येथेच एमआयडीसीमधील कारखान्यात काम करणारे कामगार, लहानमोठे व्यावसायिक आणि रोजमजुरी करणारी कुटुंबे राहतात. त्यामुळे कोरोना संशयित आपल्या परिसरात राहत असल्याने त्यांच्यातही भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच वानाडोंगरी येथील ज्या वसतिगृहात त्यांना ठेवण्यात आले तेथे खोलीनिहाय पुरेशी व्यवस्था नाही. वसतिगृहाच्या इमारतीलगतच शहराला पाणीपुरवठा होणारी विहीर आहे.त्यांना अशा दाट लोकवसाहतीत ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच जोपर्यंत यावर निर्णय होत नाही तोपर्यंत तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले.यावेळी त्यांच्यासोबत वानाडोंगरीच्या नगराध्यक्षा वर्षा शाहाकार, जिल्हा परिषद सदस्य राजू हरडे, उपसरपंच कैलाश गिरी, माजी जि.प. सदस्य अंबादास उके, सतीश शाहाकार, उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, आभा काळे, सभापती बाळू मोरे, सचिन मेंडजोगे आदी होते.यासोबतच माजी मंत्री रमेश बंग यांनीही येथील क्वारंटाईन सेंटर हटवण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जि.प. सदस्य दिनेश बंग, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, सुचिता विनोद ठाकरे, सभापती बबनराव आव्हाळे, तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, विनोद ठाकरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोळे यांनीही जिल्हाधिकारी ठाकरे यांना यासंदर्भात निवेदन सादर केले.एकूणच लोकप्रतिनिधींचा येथील क्वारंटाईन सेंटरला असलेला विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी येथील क्वारंटाईन सेंटर दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचे आश्वासन दिले. शहरातील दुसऱ्या ठिकाणी ज्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जागा उपलब्ध होती, तिथे स्थानांतरित करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत स्थानांतरणाची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन