लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी मदतीची अपेक्षा होती. दुर्दैवाने सरकारने घेतलेला निर्णय तोंडाला पाने पुसणारा आहे. पंजाबने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली, मग महाराष्ट्र का देत नाही, असा सवाल काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्रडेट्टीवार म्हणाले, पीक उद्ध्वस्त झाले, धान, फळबाग, द्राक्ष, मोसंबी उद्ध्वस्त झाले. जमीन खरडून गेली.
सरकारने तोकडी मदत आकडा फुगवून सांगितली आहे, हे ३१ हजार कोटी आले कुठून, फक्त आकड्यांचा खेळ आहे. पीक विम्याची पॉलिसी आहे, पाच नवीन निकष घातले. त्यात अतिवृष्टी असल्याने शेतकऱ्यांना पीक विमा नाही, फळबाग टोमॅटोचा उल्लेख नाही. या सगळ्यात शेतकऱ्याला उद्ध्वस्त होण्यापासून पुरात लोटण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीची गरज होती. पण, घोषणा झाली नाही. कर्जमाफी देऊ म्हणतात. पण, कधी देणार ते सांगत नाहीत. या अपुऱ्या मदतीच्या विरोधात काँग्रेस जिल्हास्तरावर मोर्चे काढेल, असा इशारा त्यांनी दिला.
ओबीसी हक्कांसाठी न्यायालयात जाऊ
२ सप्टेंबरच्या जीआरला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सरकार म्हणते, शपथपत्र तयार आहे. पण, निवडणुका काढण्याचे सरकारचे प्लॅनिंग आहे, असा आरोप करीत ओबीसींच्या हक्कासाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला. आता आम्हाला टार्गेट करून बोलले जात आहे. कोणाच्या सांगण्यावरून हे करत आहे, हे 'अनपढ़ गवार'चे लक्षण आहे. बोलविता धनी कोणी तरी दुसराच आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.
Web Summary : Congress leader Vijay Wadettiwar questions why Maharashtra isn't matching Punjab's ₹50,000 per hectare aid to farmers affected by excessive rainfall. He criticizes the state's inadequate compensation, flawed insurance policies, and lack of debt waivers, warning of protests. He also vows to fight for OBC rights in court.
Web Summary : कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने पूछा कि महाराष्ट्र पंजाब की तरह किसानों को ₹50,000 प्रति हेक्टेयर की सहायता क्यों नहीं दे रहा है। उन्होंने राज्य के अपर्याप्त मुआवजे, त्रुटिपूर्ण बीमा पॉलिसियों और ऋण माफी की कमी की आलोचना की और विरोध प्रदर्शन की चेतावनी दी। उन्होंने ओबीसी अधिकारों के लिए अदालत में लड़ने का भी संकल्प लिया।