मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:14 IST2021-02-23T04:14:04+5:302021-02-23T04:14:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गुमगाव : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ...

Punitive action against those who do not use masks | मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

गुमगाव : शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई माेहीम सुरू केली आहे. गुमगाव ग्रामपंचायत क्षेत्रात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून तीन हजार ९०० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमावलीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

बाजारात ग्राहक, दुकानदार आणि नागरिक मास्कचा वापर करीत नाही. शिवाय, अनावश्यक वाढत्या गर्दीमुळे काेराेना संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, परिसरात मास्कविना आढळून आलेल्या २० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत त्यांच्याकडून ३,९०० रुपयाचा दंड वसूल केला. शारीरिक अंतर पाळून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हात वारंवार स्वच्छ धुवावे, ताेंडाला मास्क लावावा आणि अनावश्यक प्रवास टाळावा. काही लक्षणे आढळल्यास आयुर्वेदिक दवाखाना तसेच ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी गजानन माहुलकर यांनी यावेळी केले. ही कारवाई सहायक पाेलीस उपनिरीक्षक परशुराम गावळे, रंजन तिवारी, हरीश गभणे, प्रफुल्ल कडू, लंकेश माहुरे, संदीप भगत, पाेलीस कर्मचारी अरविंद घिये, ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश देवगडे, केशव निवांत आदींच्या पथकाने केली.

Web Title: Punitive action against those who do not use masks