बापाला ठार मारणाऱ्या मुलाची शिक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 20:00 IST2018-12-10T19:59:23+5:302018-12-10T20:00:09+5:30

बापाला ठार मारणाऱ्या मुलाची १० वर्षे कारावास व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे.

The punishment for the son who killed his father continued | बापाला ठार मारणाऱ्या मुलाची शिक्षा कायम

बापाला ठार मारणाऱ्या मुलाची शिक्षा कायम

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : यवतमाळ जिल्ह्यातील प्रकरण

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बापाला ठार मारणाऱ्या मुलाची १० वर्षे कारावास व अन्य शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी हा निर्णय दिला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील आहे.
रवी प्रकाश उईके (३०) असे आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी आहे. मयत प्रकाश हा वरुड येथील उत्तम जिचकार यांच्या शेतात नोकर होता. तो पत्नी व आरोपी रवीसोबत शेतामध्ये राहात होता. आरोपीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याचे आरोपी व पत्नीसोबत नेहमी भांडण होत होते. १५ मे २०१६ रोजी रात्री ९ च्या सुमारास प्रकाशचे व आरोपीचे भांडण झाले. दरम्यान, आरोपीने प्रकाशला उभारीने मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन प्रकाशचा मृत्यू झाला. १४ जुलै २०१७ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यामध्ये १० वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपीचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

Web Title: The punishment for the son who killed his father continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.