शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रिजन विरोधात जनमताचा कौल

By admin | Updated: January 23, 2016 03:07 IST

नागपूर सुधार प्रन्यासने जिल्ह्यातील ७२१ गावांचा समावेश असलेला नागपूर मेट्रो रिजन विकास आराखडा फेब्रुवारी २०१५ ला जाहीर केला.

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने जिल्ह्यातील ७२१ गावांचा समावेश असलेला नागपूर मेट्रो रिजन विकास आराखडा फेब्रुवारी २०१५ ला जाहीर केला. या आराखड्याच्या विरोधात जय जवान, जय किसान संघटनेतर्फे जिल्ह्यातील ३९१ गावात जनमत चाचणी घेतली. शुक्रवारी या जनमत चाचणीच्या मतमोजणीला संविधान चौकात सुरुवात झाली. जनमत चाचणीच्या माध्यमातून ग्रामीणमधील लाखो नागरिकांनी मेट्रोरिजनच्या आराखड्याला नकार देत तो रद्द करण्याची मागणी केली आहे. नागपूर मेट्रो रिजन आराखडा हा अन्यायकारक आहे किंवा नाही यावर डिसेंबर महिन्यात जय जवान जय किसान संघटनेतर्फे अभियान राबविण्यात आले. संघटनचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या मार्गदर्शनात ३९१ गावांमध्ये जनमत चाचणी घेतली. शुक्रवारी संविधान चौकात मतमोजणीला जाहीरपणे सुरुवात झाली. या वेळी मतमोजणीला प्रशांत पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, डॉ. शरद निंबाळकर आदी उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जिल्ह्यातील कामठी, नागपूर ग्रामीण, सावनेर, उमरेड, कळमेश्वर, पारशिवनी व कुही तालुक्यातील २२६ गावातील मतमोजणी पूर्ण झाली होती. यात ३ लाख १० हजार ५०६ मतदारांपैकी २ लाख ६६ हजार ६६ मतदारांनी मेट्रोरिजनचा आराखडा अन्यायकारक आहे असा कौल दिल्याचे दिसून आले. मतमोजणीत नरेंद्र पलांदूरकर, अरुण वनकर, विजयकुमार शिंदे, प्रवीण राऊत, डॉ. नेहा पलांदूरकर, किशोर चोपडे, रुद्रेश कापगते, सागर हिंगवे, शरद खेडीकर, राजेश तरार, समर शेख, मिलिंद महादेवकर, गंगाराम खेडकर, सागर खानोरकर, प्रकाश डोंगरे, मोतीराम रहाटे, पंकज कोंगे आदींनी भाग घेतला. मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालणार असून अंतिम निकाल शनिवारी सकाळी जाहीर केला जाणार आहे. संघटनेने यापूर्वीही मेट्रो रिजन आराखड्याच्या विरोधात जनजागृती मोहीम राबविली. खुली जाहीर सुनावणी घेतली. हिवाळी अधिवेशनात विधानभवनावर मोर्चा काढला होता.