लोकमत नागपूर आवृत्तीच्या सविता हरकरे यांना झाडे फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 10:13 IST2018-11-05T10:12:12+5:302018-11-05T10:13:03+5:30

सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१९ चे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना सी.मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Public award of Lokmat Nagpur version of Savita Harakrane Award for Jhande Foundation | लोकमत नागपूर आवृत्तीच्या सविता हरकरे यांना झाडे फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर

लोकमत नागपूर आवृत्तीच्या सविता हरकरे यांना झाडे फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर

ठळक मुद्देकल्याणी ढोले, पारोमिता गोस्वामी, डॉ. कापसे, डॉ. थोरात यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१९ चे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना सी.मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यासोबतच दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या कल्याणी ढोले यांना डॉ. गोविंद समर्थ अपंग सेवा कार्य पुरस्कार, कष्टकरी, महिलांसाठी काम करणाऱ्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांना मीराबेन शाह सामाजिक कार्य पुरस्कार, शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ.प्रा. जयश्री कापसे-गावंडे यांना ना.बा. सपाटे आदर्श शिक्षक पुरस्कार आणि महिलांच्या आरोग्यावर उल्लेखनीय काम करणाऱ्या डॉ. माधुरी थोरात यांना डॉ. अतुल कल्लावार आरोग्य सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दहा हजार रुपये, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. १ जानेवारी रोजी नागपूर येथे मान्यवरांना अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Public award of Lokmat Nagpur version of Savita Harakrane Award for Jhande Foundation