शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बुलेटच्या धडकेत पीएसआय गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 01:02 IST

बुलेटचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे कर्तव्यावर असलेला एक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गंभीर जखमी झाला. विजय मधुकर गीते असे जखमी पीएसआयचे नाव असून, ते वाहतूक शाखेच्या चेंबर ४ मध्ये कार्यरत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभीम चौकाकडून हसनबागकडे जाणाऱ्या मार्गावरील उदय लॉनसमोर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनंदनवनमध्ये गुन्हा दाखल : बुलेटचालकासह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुलेटचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे कर्तव्यावर असलेला एक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गंभीर जखमी झाला. विजय मधुकर गीते असे जखमी पीएसआयचे नाव असून, ते वाहतूक शाखेच्या चेंबर ४ मध्ये कार्यरत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभीम चौकाकडून हसनबागकडे जाणाऱ्या मार्गावरील उदय लॉनसमोर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.आरोपींची नावे मोहम्मद उबेर मोहम्मद इद्रिस (वय २०) आणि निहाल अख्तर मोहम्मद अनिस अन्सारी (वय २२) अशी आहेत. हे दोघेही इस्लामपुºयातील येरखेडा मशिदीजवळ राहतात. ते आठवडी बाजारात रेडिमेड कपडे विकण्याचा व्यवसाय करतात, अशी पोलिसांची माहिती आहे.हेल्मेटसक्ती कारवाईच्या संबंधाने पीएसआय गीते, हवालदार चंद्रकांत लक्ष्मण पाचोरे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदय लॉनजवळ हजर होते. समोरून येणारी बुलेट (एमएच ४०/ बीएम ७७०१) वेगात येताना पाहून आणि बुलेटचालकाने हेल्मेट घातले नसल्याचे दिसल्याने पीएसआय गीते यांनी चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला. मात्र, आरोपी उबेर याने बुलेटचा वेग कमी केला नाही. त्याने तशाच वेगात बुलेट दौडवली. समोर गीते आडवे झाल्याचे पाहून त्याने त्यांच्या अंगावर बुलेट घातली. त्यामुळे पोट आणि कोथ्याला जबर मार बसून गीते खाली पडले. मागे बसलेला आरोपी निहाल याने तशाही अवस्थेत आरोपी उबेरला बुलेट पळविण्याचा इशारा केला. त्यामुळे पळून जाण्याच्या प्रयत्नात बुलेट अनियंत्रित होऊन दोन्ही आरोपी खाली पडले. त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या पीएसआय गीतेंना प्रारंभी बाजूच्या इस्पितळात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची अवस्था बघून त्यांना तातडीने दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गीतेंना आॅरेंज सिटी इस्तिपतळात दाखल करण्यात आले. हवालदार पाचोरे यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी उबेर तसेच निहालविरुद्ध कलम ३०७ (जीव घेण्याचा प्रयत्न), ३५३ (सरकारी कामात व्यत्यय) आणि अन्य कलमांसह गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.पोलीस दलात रोषवाहतूक शाखेच्या उपनिरीक्षकाला बुलेट चालकाने जाणीवपूर्वक धडक मारून गंभीर जखमी केल्याचे वृत्त झपाट्याने शहरात पसरले. त्यामुळे पोलीस दलात रोष निर्माण झाला. मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी, कर्मचारी इस्पितळात पोहचले. माहिती कळताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, परिमंडळ ४ चे उपायुक्त नीलेश भरणे, उपायुक्त चिन्मय पंडित यांनीही आॅरेंज सिटी इस्पितळात जाऊन जखमी गीतेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. गीतेंची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.आक्रमकता अंगावर आलीगेल्या दोन दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्तीची विशेष कारवाई मोहीम शहरात राबविणे सुरू केले आहे. त्यानुसार, गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी १११५ दुचाकीचालकांवर कारवाई केली. अनेक ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईची नको तेवढी आक्रमकता दाखवतात. आजच्या घटनेला अशीच आक्रमकता पीएसआय गीतेंनी दाखविली. ती त्यांच्या अंगावर आली.

 

टॅग्स :AccidentअपघातNagpur Policeनागपूर पोलीस