शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

पीरिपाला आघाडीमध्ये मिळाल्या सहा जागा :  जोगेंद्र कवाडे यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:14 PM

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे.

ठळक मुद्देवंचितमध्ये आंबेडकरी नेत्यांना स्थान नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातून एकही जागा लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वातील धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांच्या आघाडीत सहभागी होत असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत आघाडीतील जागा वाटपाबाबत गणित निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पीरिपाला सहा जागा देण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीने मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. मिळालेल्या जागांमध्ये भंडारा, भुसावळ, नाशिक, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, बडनेरा या जागांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीरिपाचे नेते जयदीप कवाडे हे भंडारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र नागपुरातून पक्षाला उमेदवारी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरच्या एकाही जागेवर आपला आग्रह नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षांना आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीपासून वंचित ठेवले, असा आरोप प्रा. कवाडे यांनी केला.७ ऑक्टोबरला भीमसैनिकांचा मेळावापीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला ७ ऑक्टोबर रोजी भीमसैनिकांच्या ३९ व्या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रा. कवाडे सांगितले. सकाळी ११ ते ५ वाजता दरम्यान आनंदनगर, सीताबर्डी येथे हा मेळावा होईल. मेळाव्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता खुले अधिवेशन घेण्यात येणार असून, आंध्र प्रदेशाचे माजी मंत्री गोलापल्ली सूर्याराव यांचे हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे, पँथर नेते गंगाधर गाडे, सूर्यकांत गाडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

टॅग्स :Jogendra kawadeजोगेंद्र कवाडेMediaमाध्यमे