शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’; गुन्ह्यांत ४५ टक्क्यांची वाढ

By योगेश पांडे | Updated: March 24, 2025 23:56 IST

दंगली पेटविण्यासाठी समाजकंटकांची मोडस ऑपरेंडी : देशपातळीवर ‘सायबर स्टॉकिंग’देखील वाढीस

नागपूर : नागपूरसारख्या शांतताप्रिय शहरात मागील आठवड्यात झालेल्या दंगली भडकविण्यात सोशल माध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आल्याची बाब समोर आली होती. मात्र, केवळ नागपूरच नव्हे तर देशपातळीवर अशा घटना वाढत आहेत. ‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’ करून समाजात विष पेरण्यावर असामाजिक तत्त्वांकडून भर देण्यात येत आहे. वर्षभरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ४५ टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली असून, सुरक्षायंत्रणांसमोरील आव्हानांमध्ये यातून वाढच झाल्याचे चित्र आहे.‘लोकमत’ला ‘एनसीआरपी’कडून (नॅशनल क्राईम रेकॉर्डिंग पोर्टल) प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. लोकांना कायदा मोडायला भाग पाडणारी प्रक्षोभक भाषणे सोशल माध्यमांतून शेअर करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यामुळे देशातील विविध भागांत दंगली पेटल्या. अशा प्रकारच्या चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांविरोधात २०२३ मध्ये ३ हजार ५९७ घटना उघडकीस आल्या. मात्र २०२४ मध्ये यात ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली व हा आकडा ५ हजार २५० वर पोहोचला. २०२१ सालापासून यात सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हा घडल्यावर तक्रार करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. त्यातही एनसीआरपीवर येऊन तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण आणखी कमी आहे.

जॉब फ्रॉड घटले, मात्र हॅकिंगमध्ये वाढऑनलाइन माध्यमातून बेरोजगारांना संपर्क करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण मधील काळात वाढीस लागले होते. मात्र आता असे फ्रॉड घटले आहेत; परंतु सोशल मीडिया प्रोफाइल्सच्या हॅकिंगमध्ये मात्र वाढ झाली आहे. २०२३ मध्ये हॅकिंगच्या ३३ हजार ७२३ घटना समोर आल्या होत्या. मात्र, २०२४ मध्ये एनसीआरपीकडे ३८ हजार २९५ प्रकरणांची नोंद झाली. जॉब फ्रॉडच्या घटनांमध्ये १३ हजार ७६४ वरून १० हजार ४६१ वर घट झाली.

फ्रेंडशिप स्वीकारताना सावध व्हा, फेक प्रोफाइल्सचा सुळसुळाटफेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फेक प्रोफाइल्सचा सुळसुळाट झालेला आहे. मात्र, फारच कमी लोक तक्रार करण्यासाठी पुढे येतात. २०२३ मध्ये फेक प्रोफाइलबाबत ३० हजार २३४ तक्रारी एनसीआरपीकडे आल्या होत्या. मात्र, २०२४ मध्ये यात मोठी वाढ झाली व हा आकडा ३९ हजार ८४६वर पोहोचल्याचे दिसून आले.

सायबर स्टॉकिंग-सेक्टिंगची समस्या कामयअनेक शहरांमधील महिला व तरुणींना सायबर स्टॉकिंग म्हणजेच सायबर पाठलाग तसेच सेक्स्टिंगच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अद्ययावत तंत्रज्ञान असतानादेखील यावर अद्यापही नियंत्रण येऊ शकलेले नाही. २०२३ मध्ये सायबर स्टॉकिंग व सेक्स्टिंगच्या ३९ हजार ८० घटनांची नोंद एनसीआरपीकडे झाली होती. २०२४ मध्ये हा आकडा ३९ हजार ७७ इतका होता.

वर्षनिहाय आकडेवारीप्रकार : २०२१ : २०२२ : २०२३ : २०२४चिथावणीखोर भाषणे : २,३२० : ४,०९२ :३,५९७ : ५,२५०प्रोफाइल हॅकिंग : १०,६५० : २६,२८८ : ३३,७२४ : ३८२९५फेक प्रोफाइल : १५,८४३ : २३,६२६ : ३०,२३४ : ३९८४६जॉब फ्रॉड : ७,५०४ : १०,२९२ : १३,७६४ : १०,४६१सायबर स्टॉकिंग : २१,५८९ : ४४,२७० : ३९,०८० : ३९,०७७