शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वितरणाची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 22:18 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : पेंच सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्यासंदर्भात पाणी वाटपाचे नियोजन करून तीन दिवसाच्या आत पाणी वितरणासंबंधीची संपूर्ण माहिती पाणी वापर संस्थांसोबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे दिलेत.पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध ...

ठळक मुद्देपालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देशपेंच प्रकल्पांतर्गत रबी पिकासाठी पाणी मिळणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : पेंच सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्यासंदर्भात पाणी वाटपाचे नियोजन करून तीन दिवसाच्या आत पाणी वितरणासंबंधीची संपूर्ण माहिती पाणी वापर संस्थांसोबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे दिलेत.पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता बी.एस. स्वामी, अधीक्षक अभियंता ललित इंगळे, कार्यकारी अभियंता तुरखेडे, एस.जी. ढवळे उपस्थित होते.पेंच नदीवर मध्यप्रदेश शासनाचे चौराई प्रकल्पाचे बांधकाम झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करताना सिंचनासाठी एक पाळी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करा. तसेच पीक पध्दतीबाबतही कृषी विभागातर्फे संपूर्ण माहिती पोहचवावी.रब्बी व खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येईल. पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणानुसार नागपूर शहरासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या  पाण्याचे नियोजन करावे. त्यानुसार पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने वॉटर आॅडिट करावे. शहरासाठी आवश्यक असणारे पाणी तसेच भूगर्भातील उपलब्ध पाणी याचा समन्वय ठेवून मॉल, उद्योग, आदींना पिण्याचे पाण्याचा वापर बंद करून तसेच अपव्यय टाळून पाण्याची बचत कशी करता येईल या संदर्भातील अहवाल एक महिन्यात सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्यात. ३,२०० कोटीचा आराखडापेंच प्रकल्पाच्या जलसाठ्यात निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मध्यप्रदेशातील लेहघोगरी येथून टनेलद्वारे पाणी आणण्याचे नियोजन आहे. तसेच कन्हान नदीवर तीन बंधारे, तसेच नाग नदीवर बंधारा बांधून हे पाणी कालव्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार २०० कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून हा प्रकल्प नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत घेण्यासंदर्भात नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.नुकसानभरपाईची मागणीपेंच प्रकल्पाअंतर्गतच्या लाभक्षेत्रामध्ये खरीप हंगामासाठी काही भागात पाणी न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केली.

 

 

टॅग्स :Waterपाणी