शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

सीटी स्कॅन दरांची वैधता सिद्ध करा : हायकोर्टाचा सरकारला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 10:09 PM

सीटी स्कॅनकरिता ठरवून दिलेल्या दरांची वैधता सिद्ध करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्दे इंडियन रेडिओलॉजिकल असोसिएशनची याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीटी स्कॅनकरिता ठरवून दिलेल्या दरांची वैधता सिद्ध करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. यासाठी सरकारला ६ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्य सरकारने खासगी डायग्नोसिस सेंटर्सना १६ स्लाईसपर्यंतच्या सीटी स्कॅनकरिता २०००, १६ ते ६४ स्लाईस सीटी स्कॅनकरिता २५०० तर, ६४ स्लाईसवरील मल्टी डिटेक्टर सीटी स्कॅनकरिता ३००० रुपये दर निश्चित करून दिला आहे. तसेच, विविध अटी लागू केल्या आहेत. यासंदर्भात २४ सप्टेंबर रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. त्याविरुद्ध इंडियन रेडिओलॉजिकल अ‍ॅण्ड इमॅजीन असोसिएशनच्या नागपूर शाखेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राज्य सरकार खासगी डायग्नोसिस सेंटर्सना दर ठरवून देऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने दर ठरविण्यासाठी १५ सप्टेंबर रोजी समिती स्थापन केली होती. त्या समितीमध्ये केवळ सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश होता. खासगी डायग्नोसिस सेंटर्सच्या प्रतिनिधींना समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही. तसेच, समितीच्या शिफारशी सार्वजनिक करण्यात आल्या नाहीत. परिणामी, नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन झाले, असेही याचिकाकर्त्यांनी नमूद केले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. कार्तिक शुकुल यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टरGovernmentसरकार