विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST2021-09-10T04:13:24+5:302021-09-10T04:13:24+5:30

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वात हे आंदोलन झाले. गेल्या दीड वर्षांपासून महाविद्यालये बंद ...

Protests of Nationalist Students Congress for vaccination of students | विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वात हे आंदोलन झाले. गेल्या दीड वर्षांपासून महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यासाठी केंद्र सरकारने लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे, अशी मागणी रवी पराते यांनी यावेळी केली. ‘भाषण थांबवा, लसीकरण राबवा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आंदोलनात भागेश्वर फेंडर, शैलेश पांडे, रुद्र धाकडे, मिलिंद मानापुरे, बाबाराव गावंडे, अविनाश शेरेकर, सुदाम राठोड, हेमंत भोतमांगे, उषा चौधरी, चंद्रकांत नाईक, प्रणव म्हैसेकर, विश्वजित तिवारी आदींनी भाग घेतला.

Web Title: Protests of Nationalist Students Congress for vaccination of students