शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात कुंभारेंच्या विरोधात दटके समर्थकांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 19:56 IST

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. कुंभारे यांना जातीच्या आधारावर उमेदवारी दिल्याचा आरोप करीत प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी बुधवारी महाल, बडकस चौकात विकास कुंभारे यांच्याविरोधात सकाळी ९ वाजता नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देमहाल, बडकस चौकात नारेबाजी : प्रवीण दटके यांना उमेदवारी नाकारल्यामुळे रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाने मंगळवारी विधानसभानिहाय उमेदवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. कुंभारे यांना जातीच्या आधारावर उमेदवारी दिल्याचा आरोप करीत प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी बुधवारी महाल, बडकस चौकात विकास कुंभारे यांच्याविरोधात सकाळी ९ वाजता नारे-निदर्शने केली.कार्यकर्ते म्हणाले, कुंभारे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. भाजपाने जातीचे राजकारण करून प्रवीण दटके यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले आहे. कार्यकर्त्याने पदाची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर काम करीत राहावे, असे तिकिट वाटपावरून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत दिसून येत आहे. पक्षाने कुंभारे यांना दिलेल्या तिकिटाचा पुनर्विचार करून दटके यांना उमेदवारी द्यावी, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. काही कार्यकर्ते म्हणाले, जातीला वा भाजपाला विरोध नाही, पण निरंतर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलू नये.खऱ्या कार्यकर्त्याला तिकिट द्यावेपक्षासाठी निरंतर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला तिकिट द्यावे. त्याला डावलता कामा नये. आम्ही भाजपाचे कार्यकर्ते असून भाजपाचेच काम करू. ही बाब नेते नितीन गडकरी यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे.राहुल खंगार, भाजपा कार्यकर्ते.जात पाहून तिकिट देऊ नयेविकास कुंभारे यांना जातीच्या आधारावर तिकिट दिले आहे. या भागात अनेकजण अविरत काम करीत आहे. त्यांना पक्षाने डावलले आहे. युवा नेते प्रवीण दटके यांना तिकिट द्यावे.राजेश गांधी, भाजपा कार्यकर्ते.खऱ्या कार्यकर्त्याला डावलू नयेउमेदवाराच्या जातीला विरोध नाही. जो निरंतर कार्य करतो, त्याला तिकिट मिळालेच पाहिजे. पण मध्य नागपुरात जात पाहून तिकिट दिली आहे. या मतदार संघासाठी प्रवीण दटके सक्षम उमेदवार होते.कमलेश नायक, भाजपा कार्यकर्ता.भाजपा जातीच्या राजकारणाबाहेर काम करतेकुठलीही व्यक्ती जातीला घेऊनच असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुसºयाबद्दल वाटणे स्वाभाविकच आहे. भाजप जातीचे राजकारण करीत नसून त्याबाहेर जाऊन काम करते. त्यात अंतिम माणसाचा विकास कसा होईल, याचा विचार करते. तिकिट वाटप करताना एक आनंदी होतो, तर दुसरा दु:खी होतो. कार्यकर्ते समजूतदार असून ते पुन्हा कामाला लागतील. कुठेही निराशा राहणार नाही. जिल्ह्यातील १२ ही जागा आम्ही जिंकू.आ. गिरीश व्यास, भाजपा प्रवक्ते.

आंदोलनात राहुल आसरे, आनंद शाह, सचिन बढिये, सुनील गाढवे, जीवन हलमारे, केशव भिवापूरकर, संजय जैन, नितीन बढिये, श्रीकांत गाढवे, शिवाजी सिरसाट, जयदीप नाकोडे, नीलेश बिंड, दिलीप घनरे, राजेंद्र पुरी, नरेंद्र मोहिते, जगन्नाथ सपेलकर, शशांक वानखेडे, अजय सालवनकर, सचिन तारे, रमाकांत बगले, सोनू चव्हाण, रूपेश डोणगावकर, अण्णा अयाचित, वामन शिंदे, दुर्गेश पेटकर, सुधीर हेमणे, मनीष वानखेडे, राजेश कन्हेरे, सचिन नाईक, धीरज चव्हाण, सचिन सावरकर, तोमेश्वर पराते, शैलेश शुक्ल, दीपांशु लिंगायत, राजेश नंदेश्वर आणि २०० पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019agitationआंदोलनBJPभाजपा