शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

डीआरएम कार्यालयात घुसले आंदोलक

By नरेश डोंगरे | Updated: July 8, 2024 15:22 IST

कामगारांवर अन्याय : उबाठाकडून न्यायाची मागणी, वरिष्ठांकडून दखल

नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकल्याने आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलकांनी अन्यायग्रस्त कामागारांना घेऊन थेट रेल्वे विभागीय व्यवस्थापकांच्या (डीआरएम) कार्यालयात धडक दिली. तेथे कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने आज दुपारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

रेल्वेतील कंत्राटी कामगारांच्या संबंधाने गेल्या अनेक महिन्यांपासून अन्यायकारक धोरण अवलंबिले जात असल्याची तक्रार आहे. कंत्राटदार आणि त्यांची माणसे भ्रष्टाचार करतात, कामगारांची पिळवणूक करतात आणि त्याबाबत आवाज काढल्यास त्यांना कामावरून काढून टाकतात. या संबंधाने वरिष्ठांकडे निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. उलट भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कामगारांवर अन्याय केला जातो. दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने रेल्वेतील सफाई कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे नितीन तिवारी यांनी अन्यायग्रस्त महिला, कामगारांसह सोमवारी दुपारी डीआरएम कार्यालयावर धडक दिली. प्रचंड घोषणाबाजी करून न्यायाची मागणी करीत आंदोलकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला.

तणाव वाढत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तिवारी यांची समजूत काढून त्यांना विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांच्या कक्षात चर्चा करण्यासाठी नेले. तेथे डीआरएम अग्रवाल यांनी आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यावर कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलक शांत झाले. 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर