शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नितीन गडकरींच्या घराबाहेर 'राडा'; पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 12:44 IST

नागपुरात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले असून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. काल अनेक शहरात मोदी यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसच्यावतीनेआंदोलन करण्यात आले होते. आज नागपुरात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले असून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर, भाजप कार्यकर्तेही याठिकाणी जमले असून त्यांच्याकडूनही प्रदर्शन केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेसने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य केले होते. या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. जोपर्यंत मोदी माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यानुसार नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले आहे. परिस्थिती पाहता पोलिसांनी याठिकाणी तगडा बंदोबस्त लावला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नारेबाजी करत निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य लोकसभेत केले, जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. ही बाब महाराष्ट्राच्या व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे भाजपही चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनीही गडकरींच्या निवासस्थानाबाहेर जमा होत आंदोलन सुरू केले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणagitationआंदोलनBJPभाजपाcongressकाँग्रेसNitin Gadkariनितीन गडकरी