शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
3
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
4
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
5
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
6
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
7
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

ठगबाज झाम बिल्डर्सला पोलिसांचे संरक्षण ? पीडित गुंतवणूकदारांचा रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:35 AM

कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीत सहभागी असलेल्या झाम बिल्डर्सला पोलिसांचे कथित संरक्षण मिळाले आहे. न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही इमामवाडा पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पीडित गुंतवणूकदारांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त तसेच परिमंडळ चारचे उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत ऐकवली.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त, उपायुक्तांची घेतली भेट

आॅनलाईन लोकमतनागपूर : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीत सहभागी असलेल्या झाम बिल्डर्सला पोलिसांचे कथित संरक्षण मिळाले आहे. न्यायालयातून अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही इमामवाडा पोलिसांकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पीडित गुंतवणूकदारांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त तसेच परिमंडळ चारचे उपायुक्त यांची भेट घेऊन त्यांना आपली कैफियत ऐकवली.राजाबाक्षा निवासी हेमंत झाम, त्याचे काका मुकेश झामने हिंगण्यातील वाघदरामध्ये २०१० ला कन्हैय्या सिटी या निवासी प्रकल्पाची योजना सुरू केली. त्यात रो हाऊस तसेच सदनिका बनविले जाणार असे सांगण्यात आले. येथे गुंतवणूक (बुकिंग) करणाऱ्यांना दोन वर्षानंतर रो हाऊस/ सदनिकेचा ताबा देण्याचे ठरले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र, दोन वर्षे झाली तरी बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या घर किंवा सदनिकेचा ताबा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. परिणामी रक्कम गुंतविणाऱ्यांनी आपली रक्कम परत मिळावी म्हणून झाम बिल्डर्सकडे तगादा लावला. बिल्डरने त्यांना धनादेश देऊन रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, नमूद तारखेला धनादेश वटलेच नाहीत. ते बाऊन्स झाल्याने गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी २०१५ मध्ये हेमंत झाम, सिकंदर झाम, महिमा झाम, मुकेश झाम आणि त्यांच्याकडचा कर्मचारी भूषण या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतरही बिल्डरकडून गुंतवणूकदारांना रो हाऊस किंवा सदनिका मिळाली नाही आणि त्यांची रक्कमही परत मिळाली नाही. आठ महिन्यांपूर्वी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने झाम बिल्डरची मालमत्ता जप्त (संलग्न) केली. पोलिसांनी त्यावेळी ही कारवाई म्हणजे मोठी उपलब्धी असून पीडित गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम त्यातून परत मिळेल, असे म्हटले होते. मात्र, तसे काही झाले नाही. दरम्यान गुंतणूकदारांना धमक्या मिळू लागल्या. त्यामुळे त्यांच्यात दहशत निर्माण झाली.फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी धनादेश बाऊन्स प्रकरणी न्यायालयात केसेस दाखल केल्या. न्यायालयाने वेळोवेळी हेमंत झाम आणि मुकेश झामविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला. झाम बिल्डरचे निवासस्थान इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. मात्र, पोलिसांकडून आतापर्यंत कोणत्याही अजामीनपात्र वॉरंटनुसार कारवाई झाली नाही.पोलिसांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या ५० ते ६० गुंतवणूकदारांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि उपायुक्त एस. चैतन्य यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. ५० पेक्षा जास्त अजामीनपात्र वॉरंट जारी होऊनही पोलीस मूकदर्शक बनले आहेत. आरोपी घरी मिळालेच नाही, असा शेरा लिहून पोलीस हे वॉरंट परत पाठवून देतात. विशेष म्हणजे, गुंतवणूकदार जेव्हा झाम बिल्डरच्या घरी जातात तेव्हा त्यांना ते घरीच आढळतात. हे ऐकून पोलीस उपायुक्त चैतन्य यांनी लगेच इमामवाडाच्या ठाणेदारांना बोलवून घेतले. त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. सोबतच योग्य ती कारवाई तातडीने केली जाईल, असे आश्वासन पीडित गुंतवणूकदारांना दिले.विशेष म्हणजे, शहरातील भूमाफियांचे कंबरडे मोडण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्याचा उद्देश पूर्ण झाल्याचे सांगून ती बरखास्त करण्यात आली. मात्र, या प्रकरणातून शहरातील अनेक भूमाफिया आहे तसेच आहेत आणि गुंतवणूकदारांचा छळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.झामकडून ठगविण्यात आलेल्या गुंतवणूकदारांची संख्या शंभरांपेक्षा जास्त असून, त्यात केवळ नागपूर विदर्भच नव्हे तर बाहेरच्या राज्यातील पीडितांचाही समावेश आहे. मिहान, मेट्रो आणि अशाच प्रकल्पामुळे नागपुरातील रिअल इस्टेट क्षेत्राने काही वर्षांपूर्वी जोरदार उसळी मारली होती. झाम आणि त्याच्यासारख्याच अनेक ठगबाज बिल्डर, प्रॉपर्टी डीलर्स तसेच त्यांच्या दलालांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीतच आपली रक्कम दामदुप्पट होणार, असे स्वप्न दाखविले होते. त्यामुळे मोठ्या संख्येत गुंतवणूकदारांनी आपली लाखोंची रोकड त्यांच्या हवाली केली. फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झाली नाही. उलट पीडितांनाच पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. एका शिक्षकाच्या माहितीनुसार, आरोपीच्या अटकेसाठी अजामीनपात्र वॉरंट जारी झाला. मात्र, या वॉरंटनुसार आरोपीला अटक करायची असेल तर १० हजार रुपये खर्चपाणी द्यावी लागेल. त्यानुसार आरोपीला अटक करणे शक्य नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते, अशी तक्रार या शिक्षकाने वरिष्ठांकडे केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर