नागपुरातील दिघोरीत फ्लॅटमध्ये सुरू होता देह व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 23:44 IST2021-01-08T23:43:13+5:302021-01-08T23:44:36+5:30
Prostitution business, riad, crime news वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत दिघोरी येथील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देह व्यवसायाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करून दोन आरोपींना अटक केली.

नागपुरातील दिघोरीत फ्लॅटमध्ये सुरू होता देह व्यवसाय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत दिघोरी येथील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देह व्यवसायाच्या अड्ड्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई करून दोन आरोपींना अटक केली. रोहन दिलीपसिंह दीक्षित (३२) जुना पारडी नाका आणि अमरदीप गंगाराम गोस्वामी (२६) पारडी रोड अशी आरोपींची नावे असून नितीन घनश्याम मोरस्कर (३३) रमना मारोती, महेश आणि गौतम गुप्ता नामक व्यक्तींचा पोलीस शोध घेत आहेत.
दिघोरी येथे भवानी अपार्टमेंट आहे. अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक २०४ आणि ३०४ मध्ये देह व्यवसाय सुरू असल्याची माहिती युनिट-४ ला मिळाली. त्यांनी डमी ग्राहक फ्लॅटवर पाठविला. त्याच्यातर्फे देह व्यवसायाची पुष्टी केल्यानंतर पोलिसांनी धाड टाकली. तिथे दोन आरोपी आणि तीन तरुणी मिळाल्या. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. नितीन मोरस्कर हा आरोपीचा सहकारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महेश हा एका फ्लॅटचा तर गौतम गुप्ता हा दुसऱ्या फ्लॅटचा मालक असल्याचे सांगितले जाते. एका फ्लॅटमध्ये देह व्यवसाय चालायचा तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये युवतींना थांबविले जायचे. दुसऱ्या फ्लॅटमध्ये हुक्क्याची व्यवस्था होती. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा युवती हुक्का पीत होत्या. एक युवती गोंदिया येथील तर दुसरी नागपूरची आहे. आरोपींविरुद्ध वाठोडा ठाण्यात अनैतिक व्यापार विरोधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अशोक मेश्राम, एपीआय विजय कसोधन, एएसआय रमेश उमाठे, हवालदार रवींद्र पानबुडे, शिपाई सतीश ठाकरे, दीपक चोले, युवानंद कडू, नरेंद्र बांते, लीलाधर भेंडारकर, सुजाता पाटील आणि अरुणा बोंद्रे यांनी केली.