शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

नागपुरात सूरतमधील वारांगना ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 11:17 AM

वर्दळीच्या ठिकाणी ग्राहकांना बोलावून त्याच्या हवाली देहविक्रय करणारी महिला-तरुणी उपलब्ध करणाऱ्या एका दलालाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

ठळक मुद्देवेश्याव्यवसाय चालविणारा दलाल गजाआड फुटाळा चौपाटीवर एसएसबीची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्दळीच्या ठिकाणी ग्राहकांना बोलावून त्याच्या हवाली देहविक्रय करणारी महिला-तरुणी उपलब्ध करणाऱ्या एका दलालाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याने वेश्याव्यवसाय करण्यासाठी सूरत(गुजरात)मधून आणलेल्या एका वारांगनेला पोलिसांनी ताब्यात घेतले. शंकर ऊर्फ सुधीर रामपद घोष (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या दलालाचे नाव असून, तो मूळचा पश्चिम बंगालमधील बाबुळगाव, नंदिया येथील रहिवासी आहे. तो सध्या शंकरनगरातील इंद्रउमा अपार्टमेंटमध्ये राहतो.घोष इंटरनेटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करीत होता. त्याच्याकडे नागपूरसह विविध राज्यातील वारांगना उपलब्ध असून, तो त्यांना विशिष्ट अवधीसाठी विशिष्ट रक्कम देऊन बोलावून घेत होता. स्वत:च्या फ्लॅटवर ठेवल्यानंतर संपर्क करताच ग्राहकाला तो वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध करून देत होता. त्याच्या ‘आॅनलाईन गोरखधंद्या’ची माहिती कळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसबीच्या पथकाने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे सोमवारी दुपारी घोषसोबत पोलिसांच्या बनावट ग्राहकाने संपर्क साधला. त्याने देहविक्रय करणारी वारांगना फुटाळा चौपाटीवर उपलब्ध करून देतो, विशिष्ट वेळेनंतर तिला तेथे सोडून दे, असे म्हणत ग्राहकाला बोलाविले. त्यानुसार, ग्राहक फुटाळा चौपाटीवर पोहोचला. तेथे घोषने त्याला एक तरुणी दिली. घोष तेथून सटकण्याच्या तयारीत असतानाच एसएसबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

१८ दिवसात १६ वी कारवाईप्रसारमाध्यमांनी टीकेची झोड उठविल्याने गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकात फेरबदल करण्यात आले. उपायुक्त कदम यांनी एसएसबी आपल्या अधिकारात येताच कुंटणखाने चालविणाºयांना पकडण्याचा धडाका लावला आहे. वर्षभरात घडल्या नाही तेवढ्या कारवाया एका महिन्यात अर्थात १८ दिवसात १६ कारवाया केल्या आहेत. त्यामुळे कुंटणखाना चालविणाऱ्यांनी आता आपली पद्धत बदलविली आहे. कुणाच्या घरात अथवा फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालविण्याऐवजी दलाल थेट ग्राहकांना वर्दळीच्या ठिकाणी बोलावतात. तेथे रक्कम घेतल्यानंतर त्याच्या हवाली वेश्याव्यवसाय करणारी तरुणी किंवा महिला उपलब्ध केली जाते. घोषने असाच गोरखधंदा चालविला होता. सूरतच्या तरुणीच्या बदल्यात त्याने १० हजार रुपये घेतले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी